पान 7 : कुटबण खूनप्रकरणी तिघांची निदरेष मुक्तता
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST
मडगाव : कुटबण येथील बारमध्ये एका इसमाचा खून केल्याचा आरोप असलेल्या चार आरोपींपैकी तिघांची अतिरिक्त सत्र न्यायालयाने निदरेष सुटका केली. या खून खटल्यातील अन्य एक संशयित लियोलिडो फ्रान्सिस्को पिंटो याचे एका अपघातात निधन झाले होते. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी या खून खटल्यातील डेस्मंड फर्नांडिस, अँन्ड्रय़ू सिमोईश आणि ज्योस्ली सिमोईश या तिघांची सबळ पुराव्याअभावी निदरेष सुटका केली. आरोपींच्या वतीने वकील राजीव गोमीस यांनी युक्तिवाद केला.
पान 7 : कुटबण खूनप्रकरणी तिघांची निदरेष मुक्तता
मडगाव : कुटबण येथील बारमध्ये एका इसमाचा खून केल्याचा आरोप असलेल्या चार आरोपींपैकी तिघांची अतिरिक्त सत्र न्यायालयाने निदरेष सुटका केली. या खून खटल्यातील अन्य एक संशयित लियोलिडो फ्रान्सिस्को पिंटो याचे एका अपघातात निधन झाले होते. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी या खून खटल्यातील डेस्मंड फर्नांडिस, अँन्ड्रय़ू सिमोईश आणि ज्योस्ली सिमोईश या तिघांची सबळ पुराव्याअभावी निदरेष सुटका केली. आरोपींच्या वतीने वकील राजीव गोमीस यांनी युक्तिवाद केला.18 मार्च 2014 रोजी कुटबण जेटी येथील इन्डीपेंडेंट बार अँण्ड रेस्टॉरंटमध्ये बेनी कादरेज (46) याला दारूच्या नशेत संशयितांनी बेदम मारहाण केल्याचा पोलिसांचा आरोप या पाचजणांवर होता. त्याला नूसी इस्पितळात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. त्यातील एक अल्पवयीन असल्याने त्याची सुटका करण्यात आली होती. भादंसंच्या 302 कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते. (प्रतिनिधी)