पान ४ - १0८ कर्मचारी आंदोलनावर तोडगा नाहीच
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
शौचालयाचीही सोय नसल्याने हाल
पान ४ - १0८ कर्मचारी आंदोलनावर तोडगा नाहीच
शौचालयाचीही सोय नसल्याने हालपणजी : सरकार १0८ कर्मचार्यांच्या प्रश्नावर कोणताही निर्णय देत नाही. मात्र, गेले महिनाभरापेक्षा जास्त कालावधीत मैदानावर आंदोलन व आता उपोषणाला बसलेल्या कर्मचार्यांना शौचालयासारखी सोय पुरविण्यासही अयशस्वी बनत आहे. आझाद मैदानावर १0८ रुग्णवाहिकेचे साधारण शंभरपेक्षा जास्त कर्मचारी आंदोलन करतात. यातील सहा कर्मचारी गुरुवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. यात २५ ते ३0 महिलांचाही समावेश आहे. मात्र, या मैदानावर कर्मचार्यांना शौचालयाची सोय नाही. येथील महिला कर्मचार्यांना मुख्य रस्त्यानजीक असलेल्या सुलभ शौचालयाचा वापर करावा लागतो. गेले दोन दिवस उपोषणासाठी बसलेल्या आंदोलकांचे मात्र, यामुळे खूपच हाल होत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपासून उपाशी असलेल्या या कर्मचार्यांना मुख्य शौचालयासाठी रस्ता ओलांडून जाणे खूपच अवघड होत आहे. याबाबत कर्मचार्यांनी पोलिसांकडे मदत मागितली असल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, कामगार संघटनेतर्फे २५ रोजी विधानसभेवर काढण्यात येणार्या मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा देणार असल्याचे १0८ रुग्णवाहिका सेवा संघटनेचे सदस्य अमर धारगळकर यांनी सांगितले. तर सोमवारपासून (२३ मार्च) कर्मचार्यांचे कुटुंबीय उपोषणाला बसून पाठिंबा देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (चौकट)आमरण उपोषणासाठी बसलेले १0८ रुग्णवाहिका कार्मचारी प्रशांत नाईक व रेश्मा गावकर (होंडा) यांच्या जवळील नातेवाईकाचे निधन शुक्रवारी झाले. मात्र, या नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठीही उपोषणाला बसलेल्या कर्मचार्यांना जाता आले नाही.