शहरं
Join us  
Trending Stories
1
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
2
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
3
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
4
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
5
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
6
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
7
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
8
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
9
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
10
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
11
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
12
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
13
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
14
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
15
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
16
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
17
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
18
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
19
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
20
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग

पान 2- कासारवर्णेत आज वादाची शक्यता महादेव देवस्थानात धार्मिक विधी कायदा सुव्यवस्था बिघडू नये साठी प्रशासनातर्फे दक्षता

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

पेडणे : सध्या प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या कासारवर्णे येथील र्शी महादेव देवस्थानात सोमवारी सकाळी होणार्‍या ‘लघुरुद्रा’मुळे येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे दक्षता घेण्यात आली आहे.

पेडणे : सध्या प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या कासारवर्णे येथील र्शी महादेव देवस्थानात सोमवारी सकाळी होणार्‍या ‘लघुरुद्रा’मुळे येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे दक्षता घेण्यात आली आहे.
या देवस्थानचे प्रशासक असलेले मामलेदार राजेश आजगावकर यांनी या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या देवस्थानची नूतन समिती बरखास्त केल्याने सध्या या ठिकाणच्या महाजनांत तीन गट निर्माण झाले आहेत. पैकी सरकारने बरखास्त केलेल्या समितीऐवजी त्यांच्या विरोधातील महाजन जोडप्याला मामलेदार आजगावकर यांनी या धार्मिक विधीचे यजमानपद दिले आहे. ही गोष्ट पुरोहिताकडून मावळत्या समितीला समजल्यांतर गावातील काही महिलांनी संबंधितांशी संपर्क साधून देवस्थानासंदर्भाचा वाद आणखी चिघळू नये यासाठी प्रशासकांनी वादग्रस्त महाजनाऐवजी त्रयस्थ असलेल्या एखाद्या महाजनाला पूजेचे यजमानपद द्यायला हवे होते, अशी भूमिका मांडली. मात्र, मामलेदारांनी हा अधिकार आपला असल्याचे सांगून आपल्या र्मजीतीलच महाजनांना हा हक्क बहाल केल्याने गावात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच हा विधी सुरळीतपणे पार पाडावा यासाठी सोमवारी (दि.31)पोलीस बंदोबस्त ठेवण्याची तयारी ठेवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सोमवारी सकाळी होणार्‍या या धार्मिक विधीमुळे या देवस्थानाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही तटस्थ महाजनांनी मामलेदार राजेश आजगावकर यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याची सूचनाही केली आहे. (प्रतिनिधी)