पान १- भूसंपादन विधेयकावरून भाजपाचे घूमजाव
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
सहा दुरुस्त्यांचा त्याग
पान १- भूसंपादन विधेयकावरून भाजपाचे घूमजाव
सहा दुरुस्त्यांचा त्यागनवी दिल्ली : भाजपाने आपल्या वादग्रस्त भूसंपादन विधेयकावरून आश्चर्यकारकरीत्या घूमजाव करीत, संपुआच्या भूसंपादन कायद्यातील शेतकर्यांच्या संमतीचे कलम आणि सामाजिक परिणामाचा अंदाज यांसह अन्य प्रमुख तरतुदींचा पुन्हा समावेश करणे आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नरेंद्र मोदी सरकारने वटहुकूमाद्वारे आणलेल्या वादग्रस्त दुरुस्त्या वगळण्यास आपली सहमती दर्शविली आहे.भूसंपादन विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीमध्ये असलेल्या भाजपाच्या सर्व ११ सदस्यांनी सोमवारी शेतकर्यांची संमती आणि सामाजिक परिणामांचा अंदाज घेण्याच्या संदर्भातील कलमाचा भूसंपादन विधेयकात पुन्हा समावेश करण्यासाठी एक दुरुस्ती प्रस्ताव मांडला, अशी माहिती सूत्रांनी दिली.