शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

एकंदरित निकालाची पोलिसांना उत्सुकता व्हॉट्स ॲपसह दूरसंचावर ऐकले निकाल

By admin | Updated: May 17, 2014 00:34 IST

अकोला : लोकसभा निवडणुकीसोबतच देशातील मतदारसंघांचा निकाल काय लागतो, याकडे पोलिसांचेही लक्ष सकाळपासून लागले होते. बंदोबस्तामध्ये असतानाही पोलिसांनी व्हॉट्स ॲपसह जिथे दूरदर्शन संच असेल, त्याठिकाणी जाऊन निकालाचे एकंदरित चित्र जाणून घेतले. बंदोबस्तातील पोलिस कर्मचारी, अधिकार्‍यांमध्ये देशभरातील निकालांचीच चर्चा रंगली होती.

अकोला : लोकसभा निवडणुकीसोबतच देशातील मतदारसंघांचा निकाल काय लागतो, याकडे पोलिसांचेही लक्ष सकाळपासून लागले होते. बंदोबस्तामध्ये असतानाही पोलिसांनी व्हॉट्स ॲपसह जिथे दूरदर्शन संच असेल, त्याठिकाणी जाऊन निकालाचे एकंदरित चित्र जाणून घेतले. बंदोबस्तातील पोलिस कर्मचारी, अधिकार्‍यांमध्ये देशभरातील निकालांचीच चर्चा रंगली होती. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खदान परिसरातील सरकारी गोडावून, जेल चौक, सिंधी कॅम्प परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. मतमोजणीचे ठिकाणी व सिंधी कॅम्प परिसरामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांसोबतच, सर्व ठाण्यांचे ठाणेदार तळ ठोकून होते; परंतु याठिकाणी अधिकार्‍यांमध्ये चर्चा होती, ती देशभरातील मतदारसंघांच्या निकालांची आणि दिग्गज उमेदवारांच्या जय-पराजयाची. या अधिकार्‍यांसोबतच, पोलिस कर्मचारीसुद्धा चर्चा करण्यामध्ये मागे नव्हते. सर्वांमध्ये एकच चर्चा होती, ती म्हणजे, नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार की नाही. 

ये तो होना ही था...पोलिस ठाण्यांमधील दूरदर्शन संचासमोरसुद्धा निकालाची स्थिती जाणून घेण्यासाठी पोलिस कर्मचार्‍यांनी एकच गर्दी केली होती. एवढेच काय, रस्त्यांवरील वाहनचालक, नागरिक ठाण्यांमध्ये येऊन निकालाची स्थिती पाहत होते. देशातील निकालांची येत असलेली स्थिती पाहून, पोलिस कर्मचार्‍यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. ये तो होना ही था... अशी प्रतिक्रिया पोलिसांच्या तोंडून ऐकायला मिळत होती.  नातेवाईक, मित्रांना माहिती देण्यासाठी, पोलिस कर्मचारीही हातात पेन, कागद घेऊन उमेदवारांच्या मतांची संख्या लिहून घेताना दिसत होते.

छाया: १७ सीटीसीएल: ४३, ४४ व ४८(व्हॉट्स ॲपवर निकाल जाणून घेताना पोलिस, दुकानामध्ये दूरदर्शन संचावरील निकाल पाहताना पोलिस, नातेवाईकांना फोनवरून निकालाची माहिती देताना पोलिस कर्मचारी.)