ऑनलाइन लोकमत
म्हैसूर, दि. २२ - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी जयललिता यांच्या समर्थकांनी शुक्रवारी म्हैसूरच्या चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जयललितांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी मंदिरातील देवतांना १.६० कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले.
चामुंडेश्वर मंदिर व्यवस्थापन बोर्डाने ही माहिती दिली. दागिन्यांमध्ये सोन्याच्या थाळया, शंखाचा समावेश आहे. अम्माच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी समर्थकांनी चामुंडेश्वरी देवीसमोर विशेष प्रार्थनाही केली.
जयललिता यांनी १२ वर्षापूर्वी नवस केला होता तो नवस पूर्ण करण्यासाठी समर्थक आले होते असा दावा मंदिराच्या पूजा-याने केला. या समर्थकांना दान केल्याची पावतीही दिल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.