नवी दिल्ली : व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यात सहभागी असल्यावरून मध्यप्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांना बडतर्फ करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व यादव यांच्याकडून उत्तर मागितले आहे.भ्रष्टाचारात गुंतल्याचे आढळल्यास राज्यपालांना हटविण्याबाबत निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाला द्यावेत, अशी विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी याचिकाकर्त्याच्या वतीनेकेली. कार्यकर्ते संजय शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी करण्यालाही सरन्यायाधीश एच.एल. दत्तू आणि न्या. शिवकीर्ती सिंग यांनी सहमती दर्शविली.
राज्यपाल रामनरेश यादव यांना नोटीस
By admin | Updated: November 21, 2015 02:24 IST