शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

रस्ता नव्हे हा तर राज्याच्या विकासाचा राजमार्ग

By admin | Updated: January 1, 2016 02:07 IST

देशभर भव्य महामार्गांची वेगाने निर्मिती हा केंद्र सरकारचा अग्रक्रम आहे. त्याला अनुसरून तयार होणारा, दिल्ली- डासना- मेरठ एक्स्प्रेस हायवे केवळ रस्ता नव्हे, तर उत्तर प्रदेशच्या

- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीदेशभर भव्य महामार्गांची वेगाने निर्मिती हा केंद्र सरकारचा अग्रक्रम आहे. त्याला अनुसरून तयार होणारा, दिल्ली- डासना- मेरठ एक्स्प्रेस हायवे केवळ रस्ता नव्हे, तर उत्तर प्रदेशच्या विकासाचा राजमार्ग ठरणार आहे. कालांतराने हा राजमार्ग लखनौपर्यंत पुढे नेण्यात येईल. महामार्गापासून १00 कि.मी.च्या व्यासात जितकी गावे आणि शहरे येतील, विकासाची तुफान घोडदौड तिथे सुरू होईल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले.दिल्ली-मेरठ या ७४ कि.मी. अंतराच्या १४ लेन एक्स्प्रेस हायवेच्या शिलान्यासप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. नोएडा सेक्टर ६२ मध्ये आयोजित या भव्य सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक परिवहनमंत्री नितीन गडकरींनी केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासह मोदी मंत्रिमंडळातले अनेक मंत्री कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. वर्षअखेरीला दिल्ली, गाझियाबाद, नोएडा व मेरठवासीयांना या विस्तीर्ण महामार्गाची अपूर्व भेट मोदी सरकारने दिली. अडीच वर्षांत हा महामार्ग तयार झाल्यानंतर, ज्या दिल्ली, मेरठ अंतरासाठी सध्या ३ तास प्रवास करावा लागतो ते अंतर अवघ्या ४0 मिनिटांत पार करता येईल. शिलान्यास सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत वाजपेयींच्या स्वप्नांचे स्मरण करून देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला जागतिक स्तरावर नेण्याचे स्वप्न पंतप्रधान असताना वाजपेयींनी पाहिले. चार महानगरांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोन, भारताच्या उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम सीमा जोडणारे भव्य कॉरिडॉर्स निर्माण करण्याचे काम त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाले. ग्रामीण भारतातल्या गावांचीही वाजपेयींना चिंता आहे. मुख्य रस्त्यापासून गावांना जोडणारे रस्ते तयार करण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजना त्यांनी सुरू केली. त्यानंतर दहा वर्षांत काय झाले आणि काय नाही, याचा हिशेब सांगण्यासाठी मी इथे आलेलो नाही. मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की, वाजपेयींच्या स्वप्नांना गती देण्याचे काम आता माझ्या सरकारने सुरू केले आहे. त्यात सर्वाधिक प्राधान्य पायाभूत सुविधांचा विकास आणि महामार्गांच्या निर्मितीला आम्ही दिले आहे. दिल्ली, मेरठ १४ लेन एक्स्प्रेस हायवेच्या शिलान्यासाच्या निमित्ताने भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरींनी उत्तर प्रदेशसह साऱ्या देशाला सुखद धक्का देणाऱ्या अनेक घोषणा आपल्या प्रास्ताविकात केल्या.रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा सरकारचा निर्णयअतिवृष्टीनंतरच्या महापुरात या राज्यातली काही गावे आणि बद्रिनाथ केदारनाथपर्यंतचा बहुतांश रस्ता वाहून गेला होता.परिवहन मंत्रालयाने आता दिल्लीपासून बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमनोत्रीपर्यंतच्या एक हजार कि.मी.च्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.या क्षेत्रात वारंवार होणाऱ्या भूस्खलनाचा धोका यापुढे उद्भवणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याची ग्वाही गडकरींनी दिली. वाहतूक कोंडीच्या समस्येतून राजधानी दिल्लीची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ व २४ चे १४ लेनपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे, अशी घोषणाही यावेळी गडकरींनी केली. शिलान्यास सोहळा व त्यानंतरच्या जाहीर सभेसाठी सुमारे ५0 हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता.