्रगोव्याहून महत्वाचे : अतिरेक्याचे गोव्यात प्रशिक्षण
By admin | Updated: September 6, 2015 23:09 IST
अतिरेक्याचे गोव्यात पॅराग्लायडिंग प्रशिक्षण-अतिरेकी सईद अफाकची कबुली-5 दिवस होते गोव्यात वास्तव्य-सुरक्षा यंत्रणे अनभिज्ञपणजी: गोव्यात अतिरेकी येऊन लपत असल्याचे आतापर्यंत उघडकीस आले होते, परंतु इंडियन मुजाउद्दीनचा खतरनाक अतिरेकी सईद इस्मायल अफाक हा गोव्यात येऊन पॅरा ग्लायडिंगचे पाच दिवस प्रशिक्षणही घेऊन गेल्याचे या अतिरेक्याने कोठडीतील तपासा दरम्यान उघड केले. अफाकला 8 जानेवारी ...
्रगोव्याहून महत्वाचे : अतिरेक्याचे गोव्यात प्रशिक्षण
अतिरेक्याचे गोव्यात पॅराग्लायडिंग प्रशिक्षण-अतिरेकी सईद अफाकची कबुली-5 दिवस होते गोव्यात वास्तव्य-सुरक्षा यंत्रणे अनभिज्ञपणजी: गोव्यात अतिरेकी येऊन लपत असल्याचे आतापर्यंत उघडकीस आले होते, परंतु इंडियन मुजाउद्दीनचा खतरनाक अतिरेकी सईद इस्मायल अफाक हा गोव्यात येऊन पॅरा ग्लायडिंगचे पाच दिवस प्रशिक्षणही घेऊन गेल्याचे या अतिरेक्याने कोठडीतील तपासा दरम्यान उघड केले. अफाकला 8 जानेवारी 2015 महिन्यात बंगळूर येथे अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अफाकची कोठडीतील चौकशी करण्यात आली होती तेव्हा त्याने बर्याच गोष्टीची कबुली दिली. त्यात तो गोव्यात येऊन पॅराग्लॅडींग प्रशिक्षण घेऊन गेल्याचेही म्हटले आहे. एका बंगळूर येथील प्रशिक्षकाकडून त्याने पाच दिवस पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतले असे त्यांनी सांगितल्याचा उल्लेख एनआाएच्या आरोपपत्रात आहे. गोव्यात पॅराग्लायडिंग नोव्हेबरच्या सुमारास होते. बंगळूरमधील केवळ एकमेव प्रशिक्षक गोव्यात येतो व त्याचे माव नरेंद्र रमण असे आहे. हरमल, व किनारी भागात तो पॅराग्लायडिंग करतो. केरी येथे एका भाड्याच्या खोलीत तो राहत होता. गोव्यात पॅरा ग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने अमेरिकेतून दोन पॅराग्लायडिंग किट्सही खरेदी केली होती. परंतु त्या नंतर त्याने गोव्यात पुन्हा पॅराग्लायडिंग केले की नाही या बद्दल काही माहिती एनआयएला मिळाली नाही. खतरनाक अतिरेकी त्रिकुटापैकी जानेवारी महिन्यात अफाब आणि अब्दस सबुर (24) या अतिरेक्यांना बंगळूर येथे अटक करण्यात आली होती तर सद्दाम हुसैन (35) याला भटकळ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएकडून त्याची चौकशी सुरू केल्यानंतर या त्रिकुटापैकी अफाकच्या गोव्यातील वास्तव्याबद्दल माहिती उघड झाली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पॅराग्लायडर्सवरही नजर ठेवण्याच्या सूचना राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्या आहेत. गोव्यात अतिरेकी येऊन पाच दिवस प्रशिक्षण घेऊन गेल्याचा सुगावा गोव्यातील पोलीस यंत्रणेंना तर लागलाच नव्हता, परंतु या अतिरेक्याने स्वत: कबुली देण्यापूर्वी एनआयएलाही लागला नव्हता. एवढेच नव्हे तर प्रशिक्षण देणार्या प्रशिक्षकालाही त्याची कल्पना नव्हती अशी एनआयएच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. (बॉक्स)एकाकी प्रशिक्षणअफाकला प्रशिक्षण देणार्या प्रशिक्षकाची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. त्याच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार अफाक हा आपल्याला एकट्यालाच स्वतंत्र प्रशिक्षण देण्यास सांगत होता. त्या पॅरा ग्लायडिंग व्यतिरिक्त टँडेम पॅराग्लायडिंगमध्येही त्याला रस होता. या शिवाय भटकळ भागात पॅराग्लायडींग शक्य आहे का याची माहितीही तो घेण्याचा प्रयत्न करीत होता.