इंदापुरात युवतीचा विनयभंग
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
इंदापूर : तालुक्यातील राजवडी येथील एका तरुणाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित युवतीनेच तक्रार दिली आहे.
इंदापुरात युवतीचा विनयभंग
इंदापूर : तालुक्यातील राजवडी येथील एका तरुणाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित युवतीनेच तक्रार दिली आहे. राजकुमार मनोहर भिसे (रा. राजवडी) असे आरोपीचे नाव असून, तो फरार आहे. सोमवारी (दि. १६) सकाळी साडेसातच्या सुमारास इंदापूर बसस्थानकाच्या आवारात ही घटना घडली. आरोपीने त्या युवतीचा हात ओढून, तू माझ्याबरोबर चल, असे म्हणत तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फौजदार एस. डी. नीलपत्रेवार पुढील तपास करीत आहेत.