स्मारक बातमीसाठी जोड
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
या स्मारकात महाराजांचे साहित्य आणि त्यांच्यावरील साहित्याची मांडणी प्रभावी पध्दतीने करता येऊ शकेल.
स्मारक बातमीसाठी जोड
या स्मारकात महाराजांचे साहित्य आणि त्यांच्यावरील साहित्याची मांडणी प्रभावी पध्दतीने करता येऊ शकेल. हा पुतळा मुंबईतच उभारण्यात यावा कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे दररोज देशभरातील आणि परदेशातील हजारो नागरिक येत असतात. त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर तेथे ते जातील आणि पर्यटन वाढेल. यामुळे स्मारकाच्या वैभवात भर पडेल. या स्मारकाला मराठीत स्वराज्य शिल्प म्हणून आणि इंग्रजीमधून स्टॅच्यू ऑफ इन्डिपिडेन्डंट किंवा स्टॅच्यू ऑफ स्वराज नाव देण्यात यावे. महाराजांनी अनेक गड, किल्ले उभारल्याने या स्मारकात त्यांच्या प्रतिकृती उभारण्यात याव्यात आणि त्यात त्यांचा इतिहास दृकश्राव्य स्वरूपात सांगण्यात येण्याची यंत्रणा उभारावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली.