बाजार बेमुदत बंद करण्याचा आडतदारांचा इशारा
By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST
पुणे : आडत रद्द करण्याचा पणन संचालकांचा निर्णय अन्यायकारक आणि दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे प्रचलित पद्धतीनेच आडत कपात केली जाईल, असे सांगत निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास बाजार बेमुदत बंद करण्याचा इशारा आडतदारांनी दिला आहे.
बाजार बेमुदत बंद करण्याचा आडतदारांचा इशारा
पुणे : आडत रद्द करण्याचा पणन संचालकांचा निर्णय अन्यायकारक आणि दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे प्रचलित पद्धतीनेच आडत कपात केली जाईल, असे सांगत निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास बाजार बेमुदत बंद करण्याचा इशारा आडतदारांनी दिला आहे.आडत रद्दच्या निर्णयासंदर्भात रविवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनची बैठक झाली. बैठकीत पणन संचालक डॉ. सुभाष माने यांच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. निर्णयाच्या अंमलबजावणीचा आग्रह धरल्यास बेमुदत बंद पुकारण्यात येईल, असे एकमताने ठरविण्यात आले, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले यांनी दिली. शेतकर्यांच्या पीमध्ये आडत कपात न करता खरेदीदाराकडून आडत कपात करण्यात शेतकर्यांचे कोणतेही हित नाही. केवळ शेतकर्यांसाठी काही निर्णय घेतल्याचे चित्र दाखवून सवंग लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे मत बैठकीत मांडण्यात आले. निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास किरकोळ विक्रीचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढतील. याचा शेतकर्यांनाही फटका बसेल, असे काही आडतदारांचे म्हणणे आहे.