शास्त्रीय संगीताकडे डोळसपणे पाहा कलापिनी कोमकली : सारंग कुलकर्णी यांचा फ्युजनच्या प्रसारासाठी प्रयत्न
By admin | Updated: January 8, 2016 23:20 IST
जळगाव- देशाला शास्त्रीय संगीताची मोठी परंपरा आहे, मोठा ठेवा आहे. पण शास्त्रीय संगीत म्हणजे बुजुर्ग, जाणकारांसाठीच आहे... त्यात काय समजण्यासारखे नसते, असे अनेकजण सहज म्हणतात. पण शास्त्रीय संगीत जाण ठेवून, दोन तीनदा मनापासून ऐकले तर ते आपल्याशी बोलू लागते... नंतर आपण त्यात रममान होतो... शास्त्रीय संगीताकडे डोळसपणे पाहीले पाहीजे, असे मत देवास येथील कलापिनी कोमकली यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले.
शास्त्रीय संगीताकडे डोळसपणे पाहा कलापिनी कोमकली : सारंग कुलकर्णी यांचा फ्युजनच्या प्रसारासाठी प्रयत्न
जळगाव- देशाला शास्त्रीय संगीताची मोठी परंपरा आहे, मोठा ठेवा आहे. पण शास्त्रीय संगीत म्हणजे बुजुर्ग, जाणकारांसाठीच आहे... त्यात काय समजण्यासारखे नसते, असे अनेकजण सहज म्हणतात. पण शास्त्रीय संगीत जाण ठेवून, दोन तीनदा मनापासून ऐकले तर ते आपल्याशी बोलू लागते... नंतर आपण त्यात रममान होतो... शास्त्रीय संगीताकडे डोळसपणे पाहीले पाहीजे, असे मत देवास येथील कलापिनी कोमकली यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले. त्या शहरात बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने शास्त्रीय गायनासंबंधी आल्या असता त्यांनी वार्तालाप केला. त्या म्हणाल्या, शास्त्रीय संगीत किंवा संगीत विषयाचे शिक्षण कला महाविद्यालयात घेतले म्हणजे आपल्याला ते संगीत यायला लागले असे नाही. संगीत शिकण्यासाठी उपासना, गुरूंचे मार्गदर्शन याची गरज आहे. रसिकही बदललेआपण म्हणतो, संगीत महोत्सव, शास्त्रीय संगीतासंबंधीच्या कार्यक्रमांमध्ये रसिक फारसे नसतात. पण तसे नाही आता संगीत महोत्सव किंवा कार्यक्रमांना सर्व वयोगटाचे रसिक असतात. रसिकांना तेच ते नको आहे. ते बदलत आहेत. त्यांच्या आवडी निवडी वेगवेगळ्या आहेत, असेही कलापिनी म्हणाल्या. घरातच संगीत- श्रीरंग कुलकर्णीसरोदवादक श्रीरंग कुलकर्णी म्हणाले की, मला घरातूनच संगीताचा वारसा मिळाला. माझे आजोबा विनायक कुलकर्णी हे तत्कालीन प्रख्यात गायक विष्णू पसूलकर यांचे शिष्य होते. त्यांनी लाहोरात संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासंबंधी योगदान दिले होते. फाळणीनंतर ते अमृतसरला स्थिरावले. वडील राजन कुलकर्णी हे सरोदवादक आहे. यामुळे तबला, सरोद वादन याची आवड होती. गांधर्व महाविद्यालयात सरोद वादनाचे शिक्षण घेतले आहे. सरोद व इलेक्ट्रॉनिक गिटारचे फ्युजनसध्या मी सरोद व इलेक्ट्रॉनिक गिटार याचे फ्युजन करीत आहे. त्यासंबंधी वाद्य निर्माण केले आहे. झीरॉड असे नामकरण तौफीक कुरेशी यांनी या वाद्यासंबंधी केले आहे. फ्युजन म्हणजेच शास्त्रीय संगीतातला पुढला भाग किंवा आवृत्ती. युवकांना फ्युजन अधिक आवडते. त्याचा प्रसार करण्यासाठी मी प्रयत्न करीत असल्याचे श्रीरंग कुलकर्णी म्हणाले. तौफीक कुरेशी यांचे पुत्र शिखरनाद कुरेशी यांची साथ मला मिळत आहे. ते झेंबे हे आफ्रीकन वाद्य माझ्यासोबत वाजवितात. शास्त्रीय संगीताला धक्का न लावता आम्ही काही वेगळे करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही ते म्हणाले. या वेळी चांदोरकर प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.