पाटणा : राज्यात दारूवर बंदी घालण्याची बिहार सरकारची अधिसूचना पाटणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केली. ही अधिसूचना घटनेतील तरतुदींशी विसंगत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जातो. बिहार सरकारने ५ एप्रिल रोजी अधिसूचना काढून राज्यात दारूविक्रीला बंदी घातली होती. मुख्य न्या. इकबाल अहमद अन्सारी आणि न्या. नवनीत प्रसादसिंह यांच्या खंडपीठाने ही अधिसूचना रद्द केली. पाच एप्रिल रोजी जारी करण्यात आलेली अधिसूचना घटनेतील तरतुदींशी सुसंगत नाही. त्यामुळे ती लागू करणे योग्य नाही. नितीशकुमार सरकारने कठोर दंडात्मक तरतुदींसह बिहारमध्ये दारूबंदी कायदा लागू केला होता. (वृत्तसंस्था)
बिहारमधील दारूबंदी अवैध
By admin | Updated: October 1, 2016 01:45 IST