शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

विजेच्या खांबाची वादळात पडझड ; सुरगाणा तालुक्यातील गावे तीन दिवसांपासून अंधारात

By admin | Updated: May 8, 2014 20:53 IST

सुरगाणा : तालुक्यातील नार-पार नदीच्या खोर्‍यातील वार्‍हे, ननाशी, मनखेड, शिरीषपाडा, रोधांणे, गळवड, देवळा यांसह ननाशी उपकेंद्रातील ६० ते ७० गावे गेल्या तीन दिवसांपासून अंधारात आहेत. या भागात तीन दिवसांपूर्वी जोरदार चक्रीवादळ झाल्याने पहुचीबारी येथील दोन विजेचे खांब जमीनदोस्त झाले, तर ननाशी येथील चार खांब जमीनदोस्त झाल्यामुळे वीज गायब असल्याचे सांगितले जात आहे. वार्‍हे भागातील ग्रामस्थांनी ननाशी येथील वीज वितरण कार्यालयात धाव घेतली असता तेथील कार्यकारी अभियतांच तीन ते चार दिवसांपासून रजेवर असल्याचे सांगण्यात आले. वीज गायब असल्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात काही गावांना पाणीपुरवठा योजना बंद आहेत, तर काही गावांना कूपनलिकांमध्ये मोटारी बसविल्यामुळे गावांना तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. वीज नसल्यामुळे अंधाराचे साम्र

सुरगाणा : तालुक्यातील नार-पार नदीच्या खोर्‍यातील वार्‍हे, ननाशी, मनखेड, शिरीषपाडा, रोधांणे, गळवड, देवळा यांसह ननाशी उपकेंद्रातील ६० ते ७० गावे गेल्या तीन दिवसांपासून अंधारात आहेत. या भागात तीन दिवसांपूर्वी जोरदार चक्रीवादळ झाल्याने पहुचीबारी येथील दोन विजेचे खांब जमीनदोस्त झाले, तर ननाशी येथील चार खांब जमीनदोस्त झाल्यामुळे वीज गायब असल्याचे सांगितले जात आहे. वार्‍हे भागातील ग्रामस्थांनी ननाशी येथील वीज वितरण कार्यालयात धाव घेतली असता तेथील कार्यकारी अभियतांच तीन ते चार दिवसांपासून रजेवर असल्याचे सांगण्यात आले. वीज गायब असल्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात काही गावांना पाणीपुरवठा योजना बंद आहेत, तर काही गावांना कूपनलिकांमध्ये मोटारी बसविल्यामुळे गावांना तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. वीज नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले असून, जंगली श्वापदांचा धोका वाढला आहे. जंगलात पाणी नसल्यामुळे तरस, बिबट्या, गावाजवळील पाणवठ्यावर येतात. सायंकाळी पाणी आणण्यास जाणार्‍या महिलांचा दृष्टीस पडत असल्याने महिलांना जीव धोक्यात घालून पाणी भरण्यास विहिरींवर, पाणवठ्यावर जावे लागत आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असून, वीज नसल्यामुळे घरात झोपणे असहय्य होत असतानाच अंगणात झोपणेही मुश्कील आहे. तालुक्याच्या वार्‍हे, अंबाडे, रोघाणे, मनखेड, जाहुले, भवाडा या गावांसह निम्म्या तालुक्यात दिंडोरी तालुक्यातील ननाशी उपकेंद्रात वीजपुरवठा होत असल्याने त्याची तक्रार मात्र तालुक्यातील अधिकारी ऐकून घेण्यास तयार नाही. वीज वितरण कंपनीने तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी देवळा, गळवड येथील देवराम वार्डे, रतन वार्डे, सीताराम मिसाळ, यमुना गायकवाड, सावित्रीबाई जाधव, जनाबाई वार्डे, गुलाब वार्डे यांनी केली आहे. दिंडोरीजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने सुरगाणा येथील वीजपुरवठा जवळपास १२ तास खंडित झाला होता.
तसेच पिंपळसोंड, उंबरपाडा, खंुटविहीर, मालगोदा या परिसरात तीन दिवसांपासून वीज गायब असून, पिंळसोंड येथील नळपाणी पुरवठा योजना बंद असल्याने तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)