लिडच्या जैका बातमीसाठी चौकट
By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST
मनी लाँडरिंगची चौकशी
लिडच्या जैका बातमीसाठी चौकट
मनी लाँडरिंगची चौकशीकेंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पाटो-पणजी येथे कार्यालय आहे. कामत व चर्चिल लाचप्रकरणी पोलिसांनी जो एफआयआर नोंद केला आहे, त्या एफआयआरची प्रत ‘ईडी’च्या कार्यालयास शुक्रवारी सकाळी मिळाली. त्या एफआयआरची पडताळणी करून त्याच धर्तीवर ‘ईडी’ने सायंकाळी ईसीआयआरची (प्राथमिक अहवाल) नोंद केली. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली ही नोंदणी करण्यात आली. कामत व चर्चिल यांचे नाव ‘ईडी’ने अजून समाविष्ट केले नाही. मात्र ‘2010 सालचे मंत्री’ असा उल्लेख आहे. लाचेद्वारे प्राप्त झालेला पैसा कुठे गेला, याचा शोध ‘ईडी’ घेणार आहे, असे सुत्रांनी सांगितले.