शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

डाव्यांच्या बंदने जनजीवन ठप्प

By admin | Updated: March 15, 2015 01:49 IST

राज्यातील माकपप्रणीत विरोधी डाव्या लोकशाही आघाडीने पुकारलेल्या बंदमुळे शनिवारी राज्यातील जनजीवन ठप्प झाले होते.

तिरुवअनंतपूरम : केरळ विधानसभेत शुक्रवारी अर्थसंकल्प सादरीकरणाच्या वेळी झालेल्या हिंसक गदारोळाच्या निषेधार्थ राज्यातील माकपप्रणीत विरोधी डाव्या लोकशाही आघाडीने पुकारलेल्या बंदमुळे शनिवारी राज्यातील जनजीवन ठप्प झाले होते. बंददरम्यान काही भागात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिरुवअनंतपुरम आणि कोल्लममध्ये दगडफेकीच्या घटनांनंतर बस वाहतूक बंद करण्यात आली. या दगडफेकीत एका बसचालकाच्या डोळ्याला जखम झाली. राजधानीत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना पोलीस संरक्षणात रुग्णालयात पोहोचविण्यात आले. कोझीकोड येथून प्राप्त वृत्तानुसार चेवयूरमध्ये एक ट्रक आणि विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टूरिस्ट बसवरही दगडफेक करण्यात आली.विरोधी आघाडीने स्वत:च्या आणखी एका अपयशावर पडदा घालण्यासाठीच संपाचे शस्त्र वापरल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री ओमान चांडी यांनी केला आहे. तर माकपचे प्रदेश सरचिटणीस कोडियारी बालाकृष्णन यांनी संप यशस्वी केल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. भ्रष्टाचाराचे कथित आरोप असलेले केरळचे अर्थमंत्री के.एम. मणी यांना अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध करणाऱ्या विरोधकांनी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला होता. (वृत्तसंस्था)४दरम्यान, केरळ विधानसभेत अभूतपूर्व गोंधळाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) आणि माकपच्या नेतृत्वातील एलडीएफने सभागृहातील हिंसक धुडगुसासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून कारवाईची मागणी केली. ४सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बहुतांश आमदारांनी एलडीएफ सदस्यांवर कारवाईची मागणी उचलून धरली.