लक्ष्मीप्रसादचा ताळगाववर विजय
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
मडगाव : एनडी ओपाराने नोंदविलेल्या ४ गोलच्या बळावर लक्ष्मीप्रसाद स्पोर्ट्स क्लबने सां मिंगेल ताळगाव क्लबचा ८-१ गोलने पराभव केला. याबरोबरच त्यांनी गोवा फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. स्पर्धेतील हा सामना धुळेर मैदानावर खेळविण्यात आला. ओपाराच्या चार गोलच्या व्यतिरिक्त लक्ष्मीप्रसादसाठी पेद्रू गोन्साल्वीसने दोन, तर फ्रिमन पिशोत व मार्कुस मास्कारेन्हसने प्रत्येकी एक गोल केला. पराभूत सां मिंगेल ताळगावचा एकमेव गोल जयंेद्र नरेंद्रने केला. (क्रीडा प्रतिनिधी)