महिलेचे एक लाखाचे मंगळसूत्र हिसकावले
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
महिलेचे एक लाखाचे मंगळसूत्र हिसकावले
महिलेचे एक लाखाचे मंगळसूत्र हिसकावले
महिलेचे एक लाखाचे मंगळसूत्र हिसकावलेलकडगंजमधील घटना : मुलाच्या शिकवणी वर्गात जाताना घडलेली घटनानागपूर : मुलाची शिकवणी वर्गातील प्रगती पाहण्यासाठी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर आलेल्या आरोपीने हिसकावून पळ काढला. ही घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली. उमा पंकज पुरोहित (३८) रा. शांतीनगर कॉलनी या आपल्या नणंदेच्या मुलीसह एव्हीएटर गाडी क्रमांक एम.एच. ४९, टी-८८०२ ने आपल्या मुलाची शिकवणी वर्गातील प्रगती पाहण्यासाठी जात होत्या. छापरुनगर चौक, बोंदरे नर्सिंग होमसमोर २५ ते ३० वयोगटातील आरोपी काळ रंगाच्या मोटरसायकलने त्यांच्या पाठी मागून आला. त्याने उमा पुरोहित यांच्या गळ्यावर थाप मारून सोन्याचे एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून पळ काढला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)................