शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

दोनशे धार्मिक संस्था जागेसाठी आग्रही कुंभमेळा : ताळमेळ बसविण्याचे प्रशासनापुढे आव्हान

By admin | Updated: March 21, 2015 00:01 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून येणार्‍या साधू-महंतांसाठी तपोवनात साधुग्रामसाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने त्यासाठी जिल्हा प्रशासन दमछाक करीत असतानाच, आखाडे-खालशांपेक्षा देशभरातील सुमारे दोनशेहून अधिक धार्मिक संस्थांनी तपोवनात जागांसाठी आग्रह धरल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. मुळात आखाडे, खालशांसाठी तपोवनातील जागा पुरेशी नसताना, त्यात जागेची मागणी करणार्‍या या संस्थांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या शिफारशी त्यासाठी सादर केल्यामुळे ताळमेळ बसविणे अवघड होऊन बसले आहे.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून येणार्‍या साधू-महंतांसाठी तपोवनात साधुग्रामसाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने त्यासाठी जिल्हा प्रशासन दमछाक करीत असतानाच, आखाडे-खालशांपेक्षा देशभरातील सुमारे दोनशेहून अधिक धार्मिक संस्थांनी तपोवनात जागांसाठी आग्रह धरल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. मुळात आखाडे, खालशांसाठी तपोवनातील जागा पुरेशी नसताना, त्यात जागेची मागणी करणार्‍या या संस्थांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या शिफारशी त्यासाठी सादर केल्यामुळे ताळमेळ बसविणे अवघड होऊन बसले आहे.तपोवनात साधुग्रामसाठी आजपावेतो सुमारे २८३ एकर जागा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करून जिल्हा प्रशासनाने ती महापालिकेकडे सुपूर्द केली असून, त्यावर कामकाजास सुरुवात झालेली आहे. गेल्या कुंभमेळ्यापेक्षा यंदाच्या कुंभात साधू-महंतांचे आखाडे व खालशांची संख्या अधिक राहणार असल्याने किमान पाचशे एकर जागेची मागणी साधू-महंतांनी यापूर्वी केली होती, परंतु प्रशासनाने केलेल्या नियोजनात सव्वातीनशे एकर जागेवर साधुग्राम उभारण्याची तयारी दर्शविली व त्यास काही अंशी साधू-महंतांनाही सहमती दर्शविली. परंतु सद्यस्थितीत सव्वातीनशे एकर जागाही पूर्ण ताब्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तपोवनातील जनार्दन आश्रम, तपोवन ब्रšागिरी आश्रम अशा पाच आश्रमांच्या ताब्यात असलेली ३३ एकर जागा देण्यास नकार दिला आहे. या आश्रमांच्या प्रमुखांच्या म्हणण्यानुसार सिंहस्थात त्यांच्या आश्रमातही साधू व भाविक मोठ्या संख्येने येणार असल्याने त्यांच्या सोयीसाठीच ही जागा ताब्यात ठेवल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तपोवन २८३ एकर वरच उभे राहणार असून, त्यातील जागेचे वाटप आखाड्यांच्या मागणीनुसार केले जाणार आहे. तत्पूर्वीच गेल्या महिन्यापासून सुमारे दोनशेहून अधिक धार्मिक संस्थांनी दोन ते पाच एकर जागा कुंभमेळ्यात धार्मिक कार्यक्रमांसाठी मिळावी म्हणून मागणी करण्यास सुरुवात केली आहे. अलाहाबाद, उज्जैन, मथुरा, दिल्ली, हरिद्वार, मुंबई, जयपूर, बिहार अशा देशातील प्रमुख धार्मिक ठिकाणांहून जिल्हा प्रशासनाकडे पत्राचा वर्षाव होत आहे. जागा मागणीच्या या पत्रांबरोबर राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व आमदार, खासदार, मंत्र्यांचे शिफारसपत्र सोबत जोडले जात असल्यामुळे या मागणीचा अनादर कसा करावा असा प्रश्न अधिकार्‍यांना पडला आहे. एकीकडे साधुग्रामसाठी अपुरी जागा त्यातच धार्मिक संस्थांचे तगादे पाहता साधुग्रामचा ताळामेळ बसविणे अवघड झाले आहे. तरिही साधुग्रामच्या जागेसाठी अगोदर आखाडे, खालशांना प्राधान्य देण्याचे व त्यानंतर उर्वरित जागेत धार्मिक संस्थांचा विचार करण्याचे ठरले आहे.