कोपरगाव सिंगल
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
जंतनाशक दिन
कोपरगाव सिंगल
जंतनाशक दिनकोपरगाव: येथील डॉ. सी़ एम़ मेहता कन्या विद्या मंदिरमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन दि़ १० फेब्रुवारी रोजी उपमुख्याध्यापक शिवाजीराव कुटे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ़ मयुर जोर्वेकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला़ कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख के़बी़ भोये यांनी केले़ सूत्रसंचालन शोभा दिघे यांनी केले़प्रकट दिन सोहळाकोपरगाव : श्री गजानन महाराज सत्संग मंडळाच्या वतीने कोपरगाव शहरात प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले़ मंगळवारी गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा ऐश्वर्याताई सातभाई यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी सत्संग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कवडे, पुरूषोत्तम नाईक, महेश कवडे, सुरेश विसपुते, हरिभाऊ केकाण, अलका कवडे, सुरेंद्र जाधव यांची उपस्थिती होती़ पूल वाहतुकीसाठी बंदकोपरगाव: शहर व बेट भागाला जोडणारा गोदावरी नदीवरील छोटा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे़ माजी आ़ अशोक काळे यांच्या प्रयत्नाने या पुलाची उभारणी झाली़ परंतु गेल्या चार वर्षात जड वाहतुकीमुळे पूल खराब झाला. त्यामुळे नगरपालिकेने पुलाच्या दोन्ही बाजूने काही उंचीवर लोखंडी खांब आडवे टाकले आहे़ शिक्षण संस्थांनी मोठ्या बसऐवजी मिनी बस शहरात वापरून सहकार्य कारावे, असे आवाहन नगराध्यक्षा ऐश्वर्यलक्ष्मी सातभाई यांनी केले आहे़