शिल्लक खोरवडीच्या सरपंचपदी
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
अनिता दगडे तर उपसरपंचपदी गणपत शिंदे यांची निवड
शिल्लक खोरवडीच्या सरपंचपदी
अनिता दगडे तर उपसरपंचपदी गणपत शिंदे यांची निवडदेऊळगावराजे : खोरवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिता दगडे तर उपसरपंचपदी गणपत लक्ष्मण शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय स्वामी यांनी दिली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणुकीमध्ये झालेल्या कुल -थोरात समर्थक गटामध्ये चुरशीच्या लढती झाल्या. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही गटाला बहुमत मत न मिळाल्याने शेवटी दोन्ही गटांनी अंतर्गत हातमिळवणी करुन सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड बिनविरोध केली. यानिवडीवेळी दोन्ही गटांनी सामजस्याची भूमिका घेऊन निवडणूक प्रकिया पूर्ण केली. याप्रसंगी अनिल गिरीगोसावी, सावळाराम दगडे, शांताराम जठार, भगवान सोनवणे, पोपट खोमणे, प्रकाश जठार, नारायण जाधव, शंकर सकट, रोहिदास जाधव यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.फोटो : खोरवडी (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीनंतर जल्लोष करताना कार्यकर्ते. (छायाचित्र : सुभाष कदम) 26082015-िं४ल्लि-19------------