कामठी शाळा....
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल, कामठी
कामठी शाळा....
स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल, कामठीकामठी : स्थानिक स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. उद्घाटन माजी जि.प. अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आ. यादवराव भोयर, किशोरीताई भोयर, अनुराधा भोयर, अनुराग भोयर, गटशिक्षणाधिकारी गोपाल कुनघटकर, प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर, डॉ. रूपाली पाटील, नीलजा उमेकर, डॉ. चांडक, प्राचार्य प्रिया अतकरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी एकल, समूहनृत्य, नाटक, पथनाट्य, समूहगीत आदी कार्यक्रम सादर केले. संचालन पुष्पा पिल्ले यांनी तर आभार कविता राऊत यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)