वकील संघाच्या अध्यक्षपदी काळे
By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST
जामखेड : जामखेड तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. अनिल काळे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. प्रवीण सानप यांची निवड झाली.
वकील संघाच्या अध्यक्षपदी काळे
जामखेड : जामखेड तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. अनिल काळे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. प्रवीण सानप यांची निवड झाली.पदाधिकारी निवडीसाठी झालेल्या मतदानात ४५ पैकी ३८ जणांनी मतदान केले.अध्यक्षपदासाठी ॲड. काळे व ॲड. वसंत वराट यांच्यात सरळ लढत झाली. यामध्ये काळे ३२ मतांनी विजयी झाले. तर उपाध्यक्षपदासाठी ॲड. प्रवीण सानप व ॲड. मोहन कारंडे यांच्यात सरळ लढत झाली. यामध्ये सानप ३७ मतांनी विजयी झाले. सचिवपदी ॲड. अभय मुरुमकर बिनविरोध निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. बी.व्ही.जायभाय व सहाय्यक म्हणून ॲड.संग्राम पोले यांनी काम पाहिले. वकील संघाच्या सदस्यांनी निवडणुकीसाठी विशेष परिश्रम घेतले.