जावडेकरांसमोर शक्तीप्रदर्शन? भाजपा नोंदणी आढावा : दोन्ही गट ताकद लावण्याची शक्यता
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
अहमदनगर : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर शनिवारी भाजपा सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यासाठी नगरमध्ये येणार आहेत. यानिमित्ताने भाजपातील खा.दिलीप गांधी व शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता असून यामुळे गटा-तटाच्या वादाला नव्या फोडणीची चिन्हे आहेत.
जावडेकरांसमोर शक्तीप्रदर्शन? भाजपा नोंदणी आढावा : दोन्ही गट ताकद लावण्याची शक्यता
अहमदनगर : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर शनिवारी भाजपा सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यासाठी नगरमध्ये येणार आहेत. यानिमित्ताने भाजपातील खा.दिलीप गांधी व शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता असून यामुळे गटा-तटाच्या वादाला नव्या फोडणीची चिन्हे आहेत.जावडेकर शनिवारी दुपारी २ वाजता विश्रामगृहावर ग्रामीण जिल्ह्यातील नोंदणीचा आढावा घेतील तर सायंकाळी ५ वाजता सावेडीतील एकवीरा चौकात भाजपा महानगर शाखेच्या सदस्य नोंदणीला उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने शहरातील गांधी-आगरकर गट शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. सध्या या दोन्ही गटांमध्ये पक्षातील वर्चस्वावरुन धुसफूस आहे. विधानसभा निवडणुकीपासून सुरु झालेला वाद सध्या टोकाला आहे. आगरकर यांनी खा.गांधी यांचे पुत्र सुवेंद्र यांच्यासह ५ गांधी समर्थकांची महानगर संघटनेतन हकालपट्टी केली होती. तर गांधी गटाने या हकालपट्टीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून स्थगिती मिळविली आहे. मात्र या प्रकरणामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत कार्यकर्तेही इरेस पेटल्याचे वातावरण पक्षात तयार झाले आहे. पक्ष सदस्य नोंदणीच्या निमित्ताने एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वादानंतर नगरमध्ये येणारे जावडेकर पक्षाचे पहिले मोठे नेते आहेत. त्यामुळे या दौर्यावर या वादाचे पडसाद असतील, असे म्हटले जाते. जावडेकर यांनी दोन्ही गटांना नाराज न करण्याची कसरत दौरा आखताना साधली आहे. दुपारी ग्रामीणचा आढावा, तर सायंकाळी महानगर शाखेच्या नोंदणीला उपस्थिती अशी रुपरेषा आखण्यात आली आहे. तरीही दोन्ही गट बैठक आणि नोंदणी कार्यक्रमावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे.