स्मारकात अश्वारूढ पुतळयाऐवजी सिंहासनाधिष्ठ किंवा राजदंड घेतलेला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा बातमी वापरू नये
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
बातमी वापरू नये
स्मारकात अश्वारूढ पुतळयाऐवजी सिंहासनाधिष्ठ किंवा राजदंड घेतलेला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा बातमी वापरू नये
बातमी वापरू नयेअमित गायकवाड यांची मागणीपुणे : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी हिरवा कंदिल मिळाल्याने आता तेथे कसा पुतळा उभारायचा यावर लक्ष देणे आवश्यक आहे. या स्मारकात अश्वारूढ पुतळा उभारण्याचा विचार सरकार करीत आहे. मात्र १९० मिटर उंच असणार्या या अश्वारूढ पुतळयामध्ये घोडयामुळे शिवराय झाकले जातील. त्यामुळे असा पुतळा उभारण्याऐवजी सिंहासनाधिष्ठ शिवराय किंवा स्वराज्याचा राजदंड हातात घेऊन उभे असलेले शिवराय असा पुतळा उभारणे योग्य राहिल. यामुळे सर्व दिशांनी शिवरायच दिसतील, अशी मागणी अमित गायकवाड यांनी केली.ते म्हणाले, शिवस्मारक हे जगातील अव्दितीय स्मारक व्हावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र व राज्यशासनाने आवश्यक त्या मंजुरी दिल्याने आता या स्मारकाच्या निर्मितीला गती येईल, ही बाब उल्लेखनिय आहे. पण सध्याच्या आराखडयात महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा विचार आहे. सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये अश्वारूढ पुतळे उभारण्यात आले असून त्यामध्ये शिवाजी महाराजांपेक्षा अश्वाचेच जास्त दर्शन होत आहे. केवळ २० टक्केच महाराजांचे दर्शन होते. स्मारकात १९० मीटर उंच पुतळा उभारण्यात येणार असल्याने त्यात अश्वच जास्तप्रमाणात दिसेल आणि शिवराय झाकोळले जातील. त्यामुळे हा पुतळा उभारणे यथोचित होणार नाही. त्याऐवजी राज्याभिषेकदिनी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून ते सिंहासनाधिष्ठ झाले होते. स्वराज्यस्थापनेचे प्रतिक म्हणून असा पुतळा या स्मारकात उभारणे यथोचित होईल. यामध्ये पूर्ण लक्ष फक्त महाराजांवरच असेल. सिंहासनाच्या दोन खांबांमधून लिफ्ट ठेऊन त्यातून वरती जाऊन नागरिकांना शिवरायांचे मुखदर्शन घेता येईल. याबरोबर पुतळा उभारणीत आणखी एक पर्याय आहे. तो म्हणजे स्वराज्य निर्मितीचे प्रतिक असलेला राजदंड उजव्या हाता घेऊन उभे असलेले महाराज हा पुतळा उभारल्यास त्यातही पूर्ण लक्ष केवळ महाराजांकडेच असेल. चारही बाजूंनी या पुतळयाकडे पाहिल्यास महाराजांचे सुंदर रूपाचे दर्शन सर्वांना होईल. राजदंडामधून लिफ्ट ठेऊन त्यातून नागरिकांना महाराजांचे मुखदर्शन होईल, असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले.ते म्हणाले, स्मारकात महाराजांच्या आयुष्यातील विविध दृश्ये दाखविणारे कारंजे उभारण्यात यावे. आधुनिक भारतीय आरमाराचे जनक म्हणून महाराजांकडे पाहिले जाते. त्यामुळे या स्मारकाच्या बाजूंनी प्रदक्षिणा घालून समुद्रात लेझर शो करावा. ज्यामध्ये महाराजांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग दाखवले जाऊ शकतील.