शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

भारताने दाखवला ‘१०४ का दम’, इस्त्रोचा विश्वविक्रम

By admin | Updated: February 15, 2017 09:36 IST

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विक्रम केला आहे

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 15 - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विक्रम केला आहे. PSLV- C37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. चेन्नईपासून १२५ कि.मी. अंतरावरील श्रीहरिकोटा येथून बुधवारी सकाळी एकाच वेळी १०४ उपग्रह पाठवून भारत अशा प्रकारची कामगिरी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येणार आहे. 
 
रशियाच्या अंतराळ संस्थेने एका वेळी ३७ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. त्या तुलनेत भारताचे हे यश मोठे आहे. यापूर्वी भारताने जून २०१५ मध्ये २३ उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण केले होते. भारतीय शास्त्रज्ञांनी एक्सएल व्हॅरिएंट या रॉकेटचा वापर केला असून सर्वांत शक्तिशाली या रॉकेटचा वापर यापूर्वी भारताने महत्त्वाकांक्षी चांद्रयान व मंगळ मोहिमेसाठी केला होता.
 
याशिवाय दुसऱ्या रॉकेटमध्ये दोन अन्य भारतीय सूक्ष्म उपग्रह असून, त्यांचे वजन १,३७८ किलो आहे. भारतीय नॅनो सॅटेलाईट आयएनएस-१ व आयएनएस-१बी यांना पीएसएलव्हीवर मोठ्या उपग्रहांना मदत करण्यासाठी विकसित करण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या नॅनो सॅटेलाईटचे प्रक्षेपण इस्रोची व्यावसायिक शाखा एन्ट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी केले जात आहे. कार्टोसॅट-२ साखळीतील मोहिमेचा कालावधी ५ वर्षांचा आहे. 
 
अशी कामगिरी करणारा भारत पहिला देश
पीएसएलव्हीने २१४ किलो वजनाच्या कार्टोसॅट-२ साखळीतील उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. त्याचा उपयोग पृथ्वीवर देखरेख ठेवण्यासाठी केला जाईल. त्यानंतर १०३ सहयोगी उपग्रहांना पृथ्वीपासून ५२० कि.मी. अंतरावरील कक्षेत समाविष्ट केले जाईल.
त्यांचे एकूण वजन ६६४ आहे. यातील ९६ उपग्रह अमेरिकेचे आहेत, तर पाच उपग्रह हे इस्रोचे आंतरराष्ट्रीय ग्राहक इस्रायल, कजाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरातचे आहेत.