वास्कोत खाप्रेश्र्वर सभागृहाचे उद्घाटन
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
वास्को : बेलाबाय येथील श्री खाप्रेश्वर देवास्थान समितीच्या सभागृहाचे उद्घाटन उद्योगपती नारायण राजाराम बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले़ या वेळी पाहुणे म्हणून स्वतंत्र सैनिक श्रीकांत धारगळकर, श्री खाप्रेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष सदानंद महाले, माजी अध्यक्ष सुभाष देसाई, उद्योजक उमेश साळगांवकर, नगरसेवक मनेष आरोलकर व नरेंद्र नाईक व्यासपीठावर उपस्थित होते़ ...
वास्कोत खाप्रेश्र्वर सभागृहाचे उद्घाटन
वास्को : बेलाबाय येथील श्री खाप्रेश्वर देवास्थान समितीच्या सभागृहाचे उद्घाटन उद्योगपती नारायण राजाराम बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले़ या वेळी पाहुणे म्हणून स्वतंत्र सैनिक श्रीकांत धारगळकर, श्री खाप्रेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष सदानंद महाले, माजी अध्यक्ष सुभाष देसाई, उद्योजक उमेश साळगांवकर, नगरसेवक मनेष आरोलकर व नरेंद्र नाईक व्यासपीठावर उपस्थित होते़ यावेळी ब्रम्हानंद बालसंस्कार केंद्रातर्फे गणपती स्त्रोत म्हणण्यात आले़ नंतर दिप प्रज्वलित करून सभागृहाचे पारंपरिक पध्दतीने उद्घाटन करण्यात आले़ दामोदर कोरगावकर व स्वातंत्र्यसैनिक श्रीकांत धारगळकर यांचा बांदेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला़ दिलीप काजळे यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष सदानंद महाले यांनी स्वागत केले. नगरसेवक मनेष आरोलकर यांनी आभार मानले़ फ ोटो आहे : १४०२ वीएएस ०१ ओळी : वास्को-बेलाबाय येथील श्री खाप्रेश्वर सभागृहाचे दीप प्रज्वलित करून उद्घाटन करताना उद्योगपती नारायण बांदेकर बाजूस स्वतंत्र सैनिक श्रीकांत धारगळकर, नगरसेवक मनेष आरोलकर, सदानंद महाले व इतऱ