शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

सुधारित - कोल्हापूरातील टोल वसुलीच्या स्थगितीला मुदतवाढ

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

कोल्हापुरातील टोल वसुलीला

कोल्हापुरातील टोल वसुलीला
तीन महिन्यांसाठी स्थगिती
मुंबई : कोल्हापूर शहरातील टोल वसुलीच्या स्थगितीला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. हा टोल कायमचाच बंद केला जाणार असून त्याबाबत कोल्हापूरकरांना दिलेला शब्द आमचे सरकार पाळेल आणि पुन्हा टोलवसुली होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोल्हापुरातील टोलवसुलीला दिलेल्या १५ दिवसांच्या स्थगितीची मुदत उद्या संपत आहे. त्यामुळे शिंदे यांनी आज संबंधितांची एक बैठक मंत्रालयात घेतली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.
कोल्हापूर टोलप्रकरणी राज्य शासनाने शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने एमएसआरडीसीचे तत्कालिन सहव्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकन समिती नेमली होती. ही समिती तसेच आधीच्या शासनाने नेमलेली प्रा.कृष्णराव समिती यांच्या अहवालांचा अभ्यास करून मूल्यांकनाची अंतिम रक्कम निि›त करण्यासाठी मुख्य अभियंता तामसेकर यांच्या समितीची स्थापना १५ दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या समितीचे काम प्रगतीपथावर असून तिचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य शासन लवकरच टोलबंदचा अंतिम निर्णय घेईल, तोवर कोल्हापुरातील टोलवसुली बंद राहील, असे शिंदे यांनी पत्र परिषदेत सांगितले. टोल बंद करताना कंत्राटदाराचे खिसे भरणारा निर्णय केला जाणर नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)