महत्त्वाचे - मतदार यादी
By admin | Updated: June 6, 2014 23:44 IST
महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये
महत्त्वाचे - मतदार यादी
महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये मतदार याद्यांची पुनर्रचनानवीन सिन्हानवी दिल्ली : ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रासह तीन राज्यांत विधानसभा निवडणूक होत असून त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पुनर्रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ३१ जुलै रोजी सुधारित याद्या प्रकाशित केल्या जातील. यावर्षी १ जानेवारीपासून आयोगाने पुनर्रचनेचे काम हाती घेताना मतदारांना नोंदणीसाठी आणखी एक संधी उपलब्ध करवून दिली होती. २१ जूनपासून चार दिवस या तिन्ही राज्यांमधील प्रत्येक मतदान केंद्रांवर विशेष शिबिर आयोजित केले जाणार आहे. ९ जुलै रोजी नियोजित मतदार याद्या प्रकाशित होतील. त्यानंतर आक्षेप मागविले जातील. अंतिम याद्या ३१ जुलै रोजी प्रकाशित होतील, असे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. मतदारांसाठी आयोजित केल्या जाणार्या विशेष शिबिरांना व्यापक प्रसिद्धी देण्याचा आदेश या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांना देण्यात आला आहे. अधिकाधिक लोकांना मतदारनोंदणी करता यावी हा त्यामागचा उद्देश आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर याद्या लावल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.