शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

बर्फाखालचा जवान ६ दिवसांनीही जिवंत

By admin | Updated: February 10, 2016 04:21 IST

उणे ४५ अंश तापमानात २५ फूट खोल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली कुणी वाचू शकल्यास त्याला चमत्कारच म्हणावे लागेल. लान्सनायक हनुमंतअप्पा यांच्याबाबत हा चमत्कार

नवी दिल्ली : उणे ४५ अंश तापमानात २५ फूट खोल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली कुणी वाचू शकल्यास त्याला चमत्कारच म्हणावे लागेल. लान्सनायक हनुमंतअप्पा यांच्याबाबत हा चमत्कार घडला आहे. सर्वत्र बर्फच बर्फ पसरला असताना गाडल्या गेलेल्या अवस्थेत ते सहा दिवसांनंतर जिवंत सापडले.सियाचीन ग्लेसियरमध्ये बेपत्ता जवानांचा शोध घेणाऱ्या पथकाने बर्फ कापून चालविलेल्या शोधमोहिमेला सोमवारी रात्री उशिरा सुदैवाने हनुमंतअप्पा यांच्या रूपाने आशेचा किरण गवसला. हनुमंतअप्पा यांना लगेच खास एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीच्या रिसर्च अँड रेफेरल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर आहे. कमी रक्तदाब आणि धक्क्यामुळे ते कोमामध्ये आहेत, अशी माहिती सदर रुग्णालयाने बुलेटिनमध्ये दिली आहे. पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळ १९,६०० फूट उंचीवरील लष्करी चौकीवर २ फेब्रुवारी रोजी हिमकडा कोसळल्यामुळे १० जवान बर्फाखाली गाडले गेले होते. उर्वरित सर्व जण मृत्युमुखी पडले असावेत, असे उत्तर लष्करी कमांडर लेप्ट. जन. डी.एस. हुडा यांनी दिले. रात्रंदिवस सुरू होती मोहीम...उणे ४५ अंश सेल्सिअस तापमानामुळे हाडे गोठवणाऱ्या थंडीत अतिशय प्रतिकूल वातावरण असताना लष्कराच्या शोधपथकाने सहा दिवसांपासून रात्रंदिवस अथक शोधमोहीम चालविली. बर्फ कापण्यासाठी कटर मशीनसह अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला. सोमवारी रात्री उशिरा बर्फ कापल्यानंतर या पथकाला हनुमंतअप्पांच्या हालचाली आढळून आल्या. दरम्यान, हनुमंतअप्पा हे कोमात असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे लष्करी रुग्णालयाने म्हटले आहे. हनुमंतअप्पा जीवित असणे हा आमच्या दृष्टीने पुनर्जन्मच असल्याची प्रतिक्रिया हनुमंतअप्पा यांच्या पत्नी महादेवी यांनी दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)मोदींनी घेतली भेट; दुर्दम्य धैर्याची प्रशंसालान्सनायक हनुमंतअप्पा यांना लष्कराच्या रुग्णालयात हलविल्याची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने तेथे जाऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. हनुमंतअप्पा हे असामान्य जवान असून त्यांनी दुर्दम्य धैर्य आणि संयमाचे दर्शन घडविले आहे, या शब्दांत मोदींनी प्रशंसा केली.हनुमंतअप्पा यांच्या अचाट धैर्याची प्रशंसा करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. ते असामान्य जवान आहेत. डॉक्टरांचा चमू त्यांच्या प्रकृतीवर निगराणी ठेवत आहे. ते लवकर बरे होतील अशी आशा असून आम्ही त्यासाठी प्रार्थना करीत आहोत असे मोदींनी टिष्ट्वटरवर म्हटले. हनुमंतअप्पा यांना भेटण्यासाठी जाण्यापूर्वी आणखी एक टिष्ट्वट जारी करीत मोदी म्हणाले की, मी हनुमंतअप्पा यांना बघण्यासाठी जात आहे. संपूर्ण देशाची प्रार्थना सोबत आहे.