ऑनलाइन टीम
बोकारो, दि. १४ - सर्व दहशतवादी एकाच समाजातील कसे असतात असा खळबळजनक प्रश्न उपस्थित करत भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी पुन्हा एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. ' विशिष्ट समुदायातील सर्वजण दहशतवादी असतात असे म्हणण्याचा माझा हेतू नाही, असे सिंह म्हणाले. मात्र दहशतवादी कारवायांमध्ये अटक करण्यात आलेले सर्वजण एकाच समाजातील असताना निधर्मी नेते या सर्वाबाबत शांत कसे बसतात ? असा प्रश्न त्यांनी विचारला.
गिरीराज सिंह यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. यापूर्वीही त्यांनी मोदींना मतदान न करणा-यांना भारतात जागा नाही, त्यांनी पाकिस्तानात जावे, असे वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. सध्या जामीनावर बाहेर आलेल्या सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.