नवी दिल्ली : सार्क (साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल को-ऑपरेशन) गृहमंत्र्यांच्या सहाव्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गृहमंत्री राजनाथसिंग गुरुवारी काठमांडूला रवाना होणार आहेत. नेपाळमध्ये शुक्रवारी ही बैठक होत आहे. या बैठकीत गृहमंत्री सीमापार दहशतवाद आणि काही सार्क देशांतील दहशतवादाचे जाळे उद्ध्वस्त करण्यासारखे मुद्दे उपस्थित करण्याची अपेक्षा आहे. मंत्रिस्तरीय तद्वतच अधिका:यांच्या बैठकीत दहशतवादाच्या उच्चटनासह सागरी सुरक्षा, पायरसी, अमली पदार्थ तस्करी, भ्रष्टाचार निमरूलन व सायबर गुन्हे या मुद्यांवर विस्तृत चर्चा करण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)