नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने दररोज प्रवास करणा:या सुमारे 4 कोटी प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा व त्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था असावी यास अर्थसंकल्पात सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगून रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी अनेक नवे उपाय जाहीर केले.
रेल ओव्हर व रेल अंडर ब्रिज बांधण्यासाठी विविध राज्य सरकारांकडून आलेले प्रस्ताव विचारात घेऊन 1,785 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. अशा पुलांसाठीच्या आरेखनांचे स्टँडर्डायजेशन करण्यात येणार असून ते ऑनलाइन उपलब्ध करण्यात येतील. तसेच ही कामे मंजूर करण्याचे अधिकार त्या विभागीय रेल्वेंना देण्यात येतील. तरी राज्य सरकारांनी आपले प्रस्ताव लवकर पाठवावे व या कामांच्या खर्चातील स्वत:चा वाटाही तत्परतेने देण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रवाशांची सुरक्षितता अधिक सुनिश्चित करण्यासाठी गाडी सुरू होण्याआधी सर्व डब्यांचे सर्व दरवाजे आपोआप बंद होण्याचे तंत्रज्ञान अंगीकारण्याचेही रेल्वेने ठरविले आहे.
रेल्वे रुळाला तडा जाणो किंवा त्यांचे वेल्डिंग नीटपणो झालेले नसणो ही गाडय़ांना अपघात होण्याची प्रमुख कारणो असतात. ती टाळण्यासाठी रेल्वे रुळातील दोष शोधणारी अत्याधुनिक, गाडीवर बसविलेली अल्ट्रासॉनिक दोशशोधन यंत्रणा वापरण्यात येईल. तसेच तुटलेले रेल्वे रूळ वेळीच शोधून काढणा:या ‘अल्ट्रासॉनिक ब्रोकन रेल डिटेक्शन सिस्टिम’ची पथदर्शक चाचणीही 2 ठिकाणी घेण्यात येईल.
रेल्वेगाडय़ा व स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्था अधिक चोख करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) 17 हजार शिपायांची नव्याने भरती केली आहे. तसेच आरपीएफमध्ये लवकरच 4 हजार महिला शिपायांचीही भरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्याही वर्गाच्या डब्यातून एकटीने प्रवास करणा:या महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला आरपीएफ शिपाई उपलब्ध झाल्यावर महिलांच्या डब्यांमध्ये त्यांना तैनात करण्यात येईल, असेही ते म्हणाले.