े|ेेउद्योजकता विकास शिबिर
By admin | Updated: April 25, 2015 02:10 IST
अहमदनगर : पेमराज सारडा महाविद्यालयात आयोजित उद्योजकता विकास शिबिराचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले़ यावेळी आयएमएसचे सरसंचालक डॉ़ शरद कोलते, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा़ मधुसूदन मुळे, उद्योजक श्रीगोपाल धूत, सुनील रामदासी, प्रा़ शिरिष मोडक आदी उपस्थित होते़
े|ेेउद्योजकता विकास शिबिर
अहमदनगर : पेमराज सारडा महाविद्यालयात आयोजित उद्योजकता विकास शिबिराचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले़ यावेळी आयएमएसचे सरसंचालक डॉ़ शरद कोलते, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा़ मधुसूदन मुळे, उद्योजक श्रीगोपाल धूत, सुनील रामदासी, प्रा़ शिरिष मोडक आदी उपस्थित होते़ यावेळी लोखंडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेक इन इंडिया ही संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी स्कील डेव्हलपमेंट होणे महत्त्वाचे आहे़ स्कील डेव्हलपमेंटसाठी पंतप्रधानांनी १५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे़ शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी शिक्षण संस्थांनी प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले़ कोलते म्हणाले की, मेक इन इंडिया या संकल्पनेमुळे भारतात उद्योग क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे़ उद्योजक क्षेत्र विकसित होणे, ही काळाची गरज आहे़ गेल्या १५ ते २० वर्षांत विकासाचा दर ८ टक्यांपर्यंत गेला असला तरी रोजगार निर्मितीचा दर २़८ टक्क्यांवरून ०़९८ टक्क्यांवर घसरला आहे़ तसेच बेरोजगारीचा दर ३़५ वरून ७़८ टक्के इतका वाढला आहे़ अशा परिस्थितीत उद्योग क्षेत्राला चालना मिळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले़ यावेळी श्रीगोपाल धूत, प्रा़ मुळे, सुरेश चव्हाण, सुनील रामदासी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले़