हॅलो 4- जागतिक छायाचित्र दिवसाचे आज पाटो येथे आयोजन
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
पणजी : छायापत्रकार संघटनेतर्फे महिती आणि प्रसिध्दी संचालनालय तसेच कला व संस्कृ ती संचालनालयातर्फे बुधवार (दि. 19) जागतिक छायाचित्र दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.
हॅलो 4- जागतिक छायाचित्र दिवसाचे आज पाटो येथे आयोजन
पणजी : छायापत्रकार संघटनेतर्फे महिती आणि प्रसिध्दी संचालनालय तसेच कला व संस्कृ ती संचालनालयातर्फे बुधवार (दि. 19) जागतिक छायाचित्र दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.पाटो येथील संस्कृती भवनात सकाळी 9.45 वा. हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाईल. या वेळी आमदार सिध्दार्थ कुंकळयेकर, कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर व माहिती व प्रसिध्दी खात्याचे संचालक अरविंद बुगडे उपस्थित असतील. कार्यक्रमात सत्कार सोहळा, बक्षीस वितरण व छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.