हॅलो 2- ध्येयाच्या अनुषंगाने मार्गक्रमण करावे : खलप
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
हणजूण : विद्यार्थ्यांनी छोटे ध्येय डोळ्यासमोर ठेवणे म्हणजे एक प्रकारचा गुन्हा असतो. ज्ञान ही एक शक्ती आहे. ज्ञानाद्वारे शिखरे पादक्रांत केली जात आहेत. विद्यार्थ्यांनी नोकरी हेच एकमेव उद्दिष्ट ठेवता कामा नये. त्यामुळे ज्ञान कुंठीत होते. विद्यार्थ्यांच्या समोर विविध व्यवसायाचे मार्ग स्वागतास उभे आहेत, असे माजी केंद्रीय कायदामंत्री अँड. रमाकांत खलप यांनी म्हापसा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
हॅलो 2- ध्येयाच्या अनुषंगाने मार्गक्रमण करावे : खलप
हणजूण : विद्यार्थ्यांनी छोटे ध्येय डोळ्यासमोर ठेवणे म्हणजे एक प्रकारचा गुन्हा असतो. ज्ञान ही एक शक्ती आहे. ज्ञानाद्वारे शिखरे पादक्रांत केली जात आहेत. विद्यार्थ्यांनी नोकरी हेच एकमेव उद्दिष्ट ठेवता कामा नये. त्यामुळे ज्ञान कुंठीत होते. विद्यार्थ्यांच्या समोर विविध व्यवसायाचे मार्ग स्वागतास उभे आहेत, असे माजी केंद्रीय कायदामंत्री अँड. रमाकांत खलप यांनी म्हापसा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. 96 कुळी मराठा संघ बार्देसतर्फे आयोजित केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम हॉटेल सुहासमधील सभागृहात पार पडला. या वेळी व्यासपीठावर डिचोलीचे आमदार नरेश सावळ, संघाचे अध्यक्ष सुहास नाईक, सचिव धर्मा नाईक, खजिनदार प्रताप परब, महिला शाखेच्या अध्यक्ष प्रिया परब उपस्थित होते. नरेश सावळ म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात नावलौकिक मिळवणार त्याबद्दल तयारी केली पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावता येणार त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सुरुवातीला संघाचे अध्यक्ष सुहास नाईक यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली. त्यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते दहावी ते पदव्युत्तरपर्यंतच्या विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. दीपप्रज्वलन प्रिया परब यांच्या हस्ते करण्यात आले. उपाध्यक्ष राघोबा सावंत यांनी आभार मानले. (वार्ताहर) फोटो : 96 कुळी मराठा संघ बार्देसच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना आमदार नरेश सावळ. सोबत अँड. रमाकांत खलप, संघाचे अध्यक्ष सुहास नाईक व इतर. (रश्मीत नाईक) 2608-एमएपी-13