दिलीप सानंदांवरील सुनावणी तहकूब
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
दिलीप सानंदांवरील सुनावणी तहकूब
दिलीप सानंदांवरील सुनावणी तहकूब
दिलीप सानंदांवरील सुनावणी तहकूबनागपूर : खामगाव येथील माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावरील सुनावणी शुक्रवारी तहकूब झाली. सानंदा यांना यापूर्वीच सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे. २००६-०७ मध्ये खामगाव नगर परिषदेने प्रशासकीय इमारतीसाठी आर्किटेक्टकडून नकाशे मागविले होते. नाशिक येथील काबरे ॲण्ड चौधरी कंपनीचे नकाशे स्वीकारण्यात आले. नामनिर्देशित सदस्य संदीप वर्मा यांनी या आर्किटेक्टचे दर तुलनेने जास्त असल्यामुळे नगर परिषदेचे ३९ लाख ४२ हजार १६९ रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करून हे प्रकरण लावून धरले. यानंतर सत्र न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी सानंदा यांच्यासह एकूण ७ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)