शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीच्या बदल्यात राज्यांना पूर्ण भरपाई !

By admin | Updated: July 28, 2016 04:52 IST

राज्यांनी व्यक्त केलेले आक्षेप व चिंता विचारात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्तू व सेवाकर (जीएसटी) ही अप्रत्यक्ष करप्राणाली लागू करण्याच्या घटनादुरुस्ती विधेयकात महत्वाच्या

- वाद सोडविण्यास ‘जीएसटी कौन्सिल’

नवी दिल्ली: राज्यांनी व्यक्त केलेले आक्षेप व चिंता विचारात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्तू व सेवाकर (जीएसटी) ही अप्रत्यक्ष करप्राणाली लागू करण्याच्या घटनादुरुस्ती विधेयकात महत्वाच्या दुरुस्त्यांना मंजुरी दिली. यात एक टक्का अतिरिक्त उत्पादन कर वगळणे व ‘जीएसटी’ लागू केल्यानंतर राज्यांच्या महसुलात सुरुवातीच्या पाच वर्षांत येणाऱ्या तुटीची भरपाई करण्याची खात्रीशीर व्यवस्था यांचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत असेही ठरले की, केंद्र व राज्ये यांच्यात उद््भवणारे वाद सोडविण्यासाठी ‘जीएसटी कौन्सिल’ स्थापन केली जाईल. या कौन्सिलवर केंद्र व राज्ये या दोघांचेही प्रतिनिधी असतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)काँग्रेसचे अंशत: समाधान- राज्यसभेत सरकारचे बहुमत नसल्याने हे घटनादुरुस्ती विधेयक दोन तृतियांश बहुमताने मंजूर करून घेण्यासाठी सरकारला काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज आहे. मात्र काँग्रेसने काही विशिष्ठ मागण्या मान्य होईपर्यंत पाठिंबा न देण्याचे जाहीर केले आहे. - ‘जीएसटी’च्या सर्वसाधारण दराहून वेगळा असा एक टक्का अतिरिक्त आंतरराज्य कर लावण्याचा प्रस्ताव वगळून काँग्रेसची एक मागणी पूर्ण झाली आहे. - ‘जीएसटी’च्या कमाल दराची मर्यादा राज्यघटनेतच नमूद करावी आणि केंद्र व राज्ये यांच्यातील वाद मिटविण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली यंत्रणा असावी या काँग्रेसच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. अशा स्थितीत सरकार काँग्रेसचे मन कसे काय वळवणार हे पाहावे लागेल. - घटनादुरुस्ती विधेयकाएवजी त्यासोबत मंजूर कराव्या लागणाऱ्या अनुपूरक विधेयकांमध्ये ‘जीएसटी’च्या कमाल दराचा उल्लेख करून काँग्रेसचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल.राज्यसभेच्या प्रवर समितीने केली होती शिफारस- विधेयकावर राज्यांच्या अर्थमंत्र्यांची मंगळवारी बैठक झाली होती. त्यात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ‘जीएसटी’मुळे राज्यांच्या महसुलात सुरुवातीच्या ५ वर्षांत योणाऱ्या तुटीची केंद्राकडून भरपाई करण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते.- मूळ विधेयकात राज्यांना होणाऱ्या तोट्यापैकी सर्व तोटा पहिली तीन वर्षे, चवथ्या वर्षी 75% व पाचव्या वर्षी ५० टक्के भरपाई देण्याची तरतूद आहे.- मात्र राज्यसभेच्या प्रवर समितीने सर्व पाच वर्षे शंभर टक्के तुटीची भरपाई केंद्राने करावी, अशी शिफारस केली होती. आजच्या या दुरुस्तीने याची पूर्तता होईल.येत्या आठवड्यात राज्यसभेत मांडणार? या दुरुस्त्यांमुळे आता ‘जीएसटी’ विधेयक संसदेचे हे पावसाळी अधिवेशन १२ आॅगस्ट रोजी संपण्यापूर्वी मंजूर करून घेणे शक्य होईल, अशी सरकारला आशा आहे. या सुधारणांसह विधेयक या नाही तरी येत्या आठवड्यात तरी राज्यसभेत नक्की मांडले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. मूळ विधेयक लोकसभेने आधीच मंजूर केलेले आहे. राज्यसभेच्या मंजुरीनंतर या दुरुस्त्या लोकसभेकडूनही मंजूर करून घ्याव्या लागतील.