फराज अहमद - नवी दिल्ली
देशातील औद्योगिक क्षेत्रच्या तुलनेत मायक्रो, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रने आपला उच्च विकास दर सातत्याने कायम राखलेला आहे, अशी माहिती मायक्रो, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली. राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात मिश्र बोलत होते.
मायक्रो, लघु आणि मध्यम उद्योग हे उद्योगांचा आकार आणि त्याच्या क्षेत्रीय संरचनेच्या संदर्भात एकजिनसीपणाचा अभाव असलेले क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रला भेडसावणा:या समस्याही भिन्नभिन्न आहेत, असे कलराज मिश्र म्हणाले. तथापि वेळेवर आणि पुरेसे कर्ज उपलब्ध न होणो, कच्च्या मालाच्या उपलब्धतेतील अडचणी, जुने तंत्रज्ञान, व्यवस्थापकीय कौशल्य आणि निपुणतेचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव, विपणनातील अवरोध अशा अनेक बाबींशी संबंधित असलेले या क्षेत्रचे काही प्रश्न मात्र एकसमान आहेत, हे मिश्र यांनी मान्य केले.
पुरेसे वित्त उपलब्ध न होणो, कच्च्या मालाचा अभाव, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय मार्गदर्शनाचा अभाव, उद्योगासाठी जागा आणि विपणन सुविधा उपलब्ध नसणो या भारतातील लघु आणि मध्यम उद्योगांच्या काही प्रमुख समस्यांशी सरकार अवगत आहे काय, असा प्रश्न विजय दर्डा यांनी विचारला होता.
हे प्रश्न सोडविण्यासाठी आपले मंत्रलय नव्या आणि विद्यमान मायक्रो आणि लघु उद्योगांसाठी कर्ज हमी निधी योजना, मंत्रलयांतर्गत राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाद्वारे अंमलबजावणी केली जात असलेली कच्च माल साहाय्य योजना, राष्ट्रीय उत्पादन स्पर्धात्मक कार्यक्रम आणि कर्जाशी संबंधित भांडवल सबसिडी योजना, व्यवस्थापन विकास आणि प्रशिक्षण कार्यक्रम, मायक्रो लघू उद्योग-समूह कार्यक्रम आणि मायक्रो, लघु व मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर्स व विपणन विकास साहाय्य यांसह अनेक योजना आणि कार्यक्रम राबवित आहे, असे मिश्र यांनी सांगितले. जुनाट आणि कालबाह्य उपकरणो आणि सुटय़ा भागांचा अपुरा पुरवठा यामुळे नौदलाला अशा आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे किंवा काय, असा प्रश्न जेटली यांना विचारण्यात आला होता.
जेटली म्हणाले, आधुनिकीकरण आणि नव्या संपत्तीचे अधिग्रहण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि प्राप्त करावयाची क्षमता, संभाव्य धोका, प्रचलित बाह्य सामरिक सुरक्षा परिस्थिती, नवनवे तंत्रज्ञान आणि निधीची उपलब्धता या आधारावर ती चालत असते. मेरिटाईम कॅपॅबिलिटी पर्सेप्शन प्लानच्या (एमसीपीपी-2क्12-2क्27) अनुसार हा आधुनिकीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
नौदलात अपघाताच्या 11 घटना
नौदलातील अपघात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘आयएनएस सिंधुरक्षक’ ही रशियन बनावटीची पाणबुडी समुद्रात बुडाली होती. तेव्हापासून नौदलात अपघाताच्या 11 घटना घडलेल्या आहेत आणि या प्रत्येक अपघाताची बोर्ड ऑफ इन्क्वायरी गठित करण्यात आलेली आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.