नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानमधील अणुकरारामुळे सरकार चिंतेत असून आम्ही हा मुद्दा चीनकडे उपस्थित केला आहे, तथापि भारताने स्वत:चे हित जपण्यासाठी पूर्णपणे तयारी केलेली आहे. आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत. धमक्या हाणून पाडण्याची पूर्ण तयारी आहे, देशाला कोणतीही झळ पोहोचणार नाही, अशी ग्वाही विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.या दोन देशांमधील अणुकरारामुळे देश सतर्क झाला असून चीनची संयुक्त राष्ट्रासारख्या जागतिक संघटनेकडे तक्रार करण्याजोगी परिस्थिती उद्भवलेली नाही. देशाचे सुरक्षाहित जपण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे त्या म्हणाल्या. प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी पाकिस्तानकडून अणुहल्ला होण्याच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यासंबंधी पूरक प्रश्नाला उत्तर देताना स्वराज म्हणाल्या की, चीनने आतापर्यंत पाकिस्तानसोबत तीन अणुकरार केले असल्याची माहिती सरकारला आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
‘चीन-पाक अणुकरारामुळे सरकार चिंतित’
By admin | Updated: December 18, 2014 05:20 IST