जयसिंगपूरच्या कर्मवीर संस्थेचागौरव
By admin | Updated: May 9, 2014 18:10 IST
जयसिंगपूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट सोसायटी या संस्थेस ३१ मार्च २०१४ अखेर २ कोटी ५८ लाखाचा निव्वळ नफा झाला असून संस्थेच्या ठेवी २२५ कोटीवर गेल्या आहेत. संस्थेचे १५७ कोटीचे येणे कर्ज आहे. उत्कृष्ट वसुली करीत संस्थेने सलग तिसर्या वर्षी शुन्य टक्के एनपीए राखला आहे. संस्थेने अहवाल वर्षात पुणे, ...
जयसिंगपूरच्या कर्मवीर संस्थेचागौरव
जयसिंगपूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट सोसायटी या संस्थेस ३१ मार्च २०१४ अखेर २ कोटी ५८ लाखाचा निव्वळ नफा झाला असून संस्थेच्या ठेवी २२५ कोटीवर गेल्या आहेत. संस्थेचे १५७ कोटीचे येणे कर्ज आहे. उत्कृष्ट वसुली करीत संस्थेने सलग तिसर्या वर्षी शुन्य टक्के एनपीए राखला आहे. संस्थेने अहवाल वर्षात पुणे, अथणी, गांधीनगर व कागवाड येथे नव्या शाखा सुरू केल्या आहेत. त्यामुळे २७ शाखा कार्यरत झाल्या आहेत. संस्थेने नुकतेच रौप्यमहोत्सवर्ष पूर्ण केले आहे.संस्थेच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहकार भारती सहकार प्रशिक्षण सहकारी संस्था मर्यादित कराड या संस्थेने कर्मवीर मल्टिस्टेट संस्थेचा गौरव केला. पुणे येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन हा गौरव करणेत आला. संस्थेच्यावतीने संचालक सागर चौगुले, भाऊसो सूर्यवंशी, बाबासो हुपरे यांनी हा गौरव स्विकारला. यावेळी सह व्यवस्थापक श्रीधर चंदोबा व अधिकारी चंद्रकांत धुळासावंत उपस्थित होते.(प्रतिनिधी)फोटो - ०९०५२०१४-जेएवाय-०२फोटो ओळी - पुणे येथे जयसिंगपूरच्या कर्मवीर मल्टिस्टेट संस्थेच्या सन्मान करताना सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील व अन्य मान्यवर.