जी. एस. आमोणकर विद्यामंदिरात गायनाचे प्रात्यक्षिक
By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST
बार्देस : म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदिरात दि. २२ रोजी देशभक्ती गीतांची प्रात्यक्षिक झाले. समुहगीत गायनातील अनेक आवश्यक गोष्टीचे विद्यार्थ्यांना ज्ञान दिले. नारायण खोर्जुवेकर यांनी स्पर्धेसाठी गीते कशी सादर करतात हे पटवून दिले. यावेळी प्रात्यक्षिकात ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उत्साहवर्धक गीतांनी मुले भारावली. मुख्याध्यापिका मेबल डिसा यांनी खोर्जुवेकरांना संधी दिली. सुरुवातीला उपमुख्याध्यापक विवेक खराडे यांनी त्यांची ओळख दिली. बाल गायिका विजया कामत, सेजल वारंग, मनाली बोरकर, ऋतुजा नाईक, आर्या कांबळी यांनी गीते आवडल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तबलासाथ अवधूत च्यारी यांची होती. संवादिनी साथ बालकलाकार प्रथम गावकर व साहिल नाईक यांनी केली. गोव्यातील गायिका छाया नाईक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)