तृणमूलचे पाच खासदार भाजपमध्ये जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 05:34 IST2020-11-24T05:34:05+5:302020-11-24T05:34:53+5:30

भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय करतात, तसे अफवा पसरविण्याचे उद्योग अर्जुनसिंह करीत आहेत, असा टोला सौगत रॉय यांनी लगावला आहे.

Five Trinamool MPs to join BJP? | तृणमूलचे पाच खासदार भाजपमध्ये जाणार?

तृणमूलचे पाच खासदार भाजपमध्ये जाणार?

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून, त्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांच्यासह त्या पक्षाचे पाच खासदार भाजपमध्ये नजीकच्या काळात प्रवेश करण्याची शक्यता आहे, असा दावा भाजप नेते अर्जुनसिंह यांनी केला आहे.

भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय करतात, तसे अफवा पसरविण्याचे उद्योग अर्जुनसिंह करीत आहेत, असा टोला सौगत रॉय यांनी लगावला आहे. खासदार सौगत रॉय हे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आल्याने पश्चिम बंगालमध्ये खळबळ माजली आहे. भाजप व तृणमूल काँग्रेसमध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरू आहे. 

Web Title: Five Trinamool MPs to join BJP?