शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

2017 मधील पहिले चंद्रग्रहण दिसणार उद्या पहाटे

By admin | Updated: February 10, 2017 15:06 IST

वर्ष 2017 मधील पहिले चंद्रग्रहण 11 फेब्रुवारी म्हणजे शनिवारपासून पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - वर्ष 2017 मधील पहिले चंद्रग्रहण 11 फेब्रुवारी म्हणजे शनिवारपासून पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तसं पाहायला गेले तर ही खगोल शास्त्रीय घटना आहे, मात्र काही जण ज्योतिष आणि धर्मानुसारही या घटनेकडे पाहतात. यानुसार ग्रहण सुरू होणे अशुभ मानले जाते. दरम्यान, वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण उपछाया चंद्रग्रहण आहे, याचा विशेष काही परिणाम होणार नाही. विरळ सावलीतून जेव्हा चंद्र जात असतो तेव्हा जे ग्रहण होते त्यास छायाकल्प चंद्रग्रहण असे म्हणतात.
11 फेब्रुवारीला सुरू होणारे उपछाया चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही. मात्र टेलिस्कॉप किंवा दुर्बिणीच्या माध्यमातून हे ग्रहण पाहणं शक्य आहे. 
 
11 फेब्रुवारीला भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श होईल आणि सकाळी 8 वाजून 23 मिनिटांनी ग्रहण मोक्ष होईल.  तर 26 फेब्रुवारी रोजी सूर्य ग्रहणदेखील असणार आहे. 
 
कुठे कुठे पाहायला मिळेल चंद्र ग्रहण?
भारतासह जपान सोडून संपूर्ण आशिया खंड, युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका या प्रदेशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे.
 
वर्षांत किती ग्रहणे होतात?
वर्षांतून सात ग्रहणे होतात; त्यात 4 सूर्य ग्रहणे, तर 3 चंद्रग्रहणे किंवा 5 सूर्य ग्रहणे व 2 चंद्र ग्रहणे यांचा समावेश असतो. एका वर्षांत किमान 2 ग्रहणे होतात पण ती सूर्य ग्रहणेच असतात.
 
चंद्र ग्रहणाबाबतची माहिती
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्र ग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत समपातळीत नसून त्यांच्या पातळयांमध्ये ५ अंशांचा ९' चा कोन आहे.
 
सूर्यप्रकाशामुळे पडणारी पृथ्वीची सावली प्रछाया व उपछाया अशी दोन प्रकारची असते. प्रछाया सावलीच्या मध्यभागी व उपछाया प्रछायेच्या भोवती असते. प्रछायेत सूर्यकिरणे अजिबात नसतात. उपछायेत मात्र सूर्यकिरण सूर्याच्या एका भागातून येतात.
 
चंद्र परिभाषांतरांवरूनरमण करत प्रथम उपछायेत येतो. त्यावेळी चंद्रप्रकाश कमी होतो. यालाच ग्रहणाचे वेध लागले असे म्हणतात.
 
त्यानंतर चंद्र प्रछायेत येतो तेव्हा चंद्राचा भाग झाकाळलेला दिसतो. तेव्हा चंद्र ग्रहण लागले असे म्हणतात.
 
कालांतराने चंद्र प्रछायेतून बाहेर पडतो व पुन्हा प्रकाशित होतो. तेव्हा ग्रहण सुटले असे म्हणतात. त्यानंतर काही काळ चंद्र उपछायेत असतो तेव्हा त्याचा प्रकाश कमी असतो.
 
काही वेळाने जेव्हा चंद्र उपछायेतून बाहेर पडतो तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीसारखा प्रकाशमान होतो. चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात.