शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

फायनल- इंद्राणी साइड स्टोरी

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

थंड डोक्याने खून करणारी इंद्राणी मुखर्जी सोशल मीडियावर सक्रिय

थंड डोक्याने खून करणारी इंद्राणी मुखर्जी सोशल मीडियावर सक्रिय
--------
डिप्पी वांकाणी
मुंबई : इंद्राणी मुखर्जी यांच्या जगण्याबद्दल सोशल मीडियात डोकावले तर ही बाई अतिशय थंड डोक्याने खून करणारी असू शकते यावर विश्वास बसणार नाही. उलट तिला पार्ट्या झोडणे व तंदुरुस्त राहून जगभर प्रवास करायला आवडतो, असे दिसेल. इंद्राणीचा पती पीटरने अगदी मोजक्या वेळाच टिष्ट्वटरचा वापर केला व तो सोशल मीडियावर सक्रियदेखील नाही. परंतु इंद्राणीला सणासुदीच्या दिवसांतील, प्रवासातील व विशेषत: आपल्या मुलीसोबतची छायाचित्रे पोस्ट करायला आवडते. इंद्राणीची तिच्या मुलीसोबतची छायाचित्रे पाहून तिच्या मित्रांनी ती दिवसेंदिवस तरूण होत असून आता ती तिच्या मुलीची बहीणच वाटते, अशी प्रतिक्रिया पाठविली. यावर्षी जुलैपर्यंत इंद्राणी सोशल मीडियावर एवढी सक्रिय होती की ते पाहून तिने आपल्या मुलीच्या खुनाचा प्रत्यक्ष आदेश दिला होता, असे कोणालाही वाटणार नाही. इंद्राणी मुखर्जी हिच्यावर शीनाच्या खुनाचा आरोप होता व तिला अटकही झाली होती. या शीनाचे लिंकएडइनवरील एकमेव अकाऊंट वगळता सोशल मिडियावर अकाऊंट नव्हते व लिंकएडइनवरील खाते २०११ पासून अपडेटही केलेले नव्हते.
इंद्राणी मुखर्जीने २०१२ मध्ये मुलगी शीनाच्या खुनाचा आदेश तिच्या ड्रायव्हरला दिल्याचा आरोप आहे. तेव्हापासून इंद्राणी केवळ जगभरच फिरत नसून तिच्या फेसबुक प्रोफाईलवर नियमितपणे छायाचित्रेही पोस्ट करीत आहे. तिने दिवाळीत सजवलेल्या घराची छायाचित्रे जशी सोशल मिडियावर पोस्ट केली त्याच उत्साहात तिने नूतन वर्षात लुटलेल्या सुट्यांच्या आनंदाची छायाचित्रेही पोस्ट केली. ३१ डिसेंबर २०१४ रोजी इंद्राणीने तिच्या फेसबुक फ्रेंडस्ला खालील शब्दांत शुभेच्छा दिल्या होत्या :
हाय ऑल, वर्षअखेर किती आनंददायी होते आणि २०१५ वर्ष किती अद्भूत आहे. सरलेले वर्ष किती धावपळीचे होते तरीही ते प्रवास, मुक्काम, कुटंबीय व मित्रांसोबत वेळ घालविणे, आरोग्यदायी खाणे असा संमिश्र आनंद लुटता येईल असे होते. वजन कमी करणे अशक्य ठरले तरीही हे संपूर्ण वर्ष तसे छान गेले. तुमचेही २०१४ हे वर्ष चांगले गेले असेल अशी मला आशा आहे. नवीन वर्ष सुरक्षित, आरोग्यदायी व आनंदी असेल व गेल्यावर्षी आपण जेवढे एकमेकांना भेटलो त्यापेक्षा २०१५ मध्ये जास्तवेळा भेटू अशी मी शुभेच्छा व्यक्त करते. आम्ही ज्या आनंदात दिवस घालविले त्याच्या घेतलेल्या छायाचित्रांचा कोलाज पीटरने केला असून तो तुम्हाला दाखवावा हा विचार केला.
प्रेमपुर्वक
विधी, पीटर आणि मी
---------
इंद्राणीने शेवटचे छायाचित्र पोस्ट केले ते १६ जुलै रोजी. तिच्या या छायाचित्राला तिच्या मित्रांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या सगळ्यांना तिने उत्तरे पाठविली. स्वत:च्या तरूण दिसण्याचे श्रेय तिने कच्चे अन्न खाण्याला दिले आहे. इंद्राणीने गोवा, स्पेन आणि इतर ठिकाणी सुट्यांचा आनंद लुटला व तेथील छायाचित्रे तिने पोस्ट केली.
बॉक्स
------
मृत शीना बोरा हिच्या ऑनलाईन पाऊलखुणा आहेत त्या लिंकएडइन या व्यावसायिक नेटवर्किंग वेबसाईटवर. शीना जुलै २०११ पासून मुंबईत रिलायन्स एडीएजीत असिस्टंट मॅनेजर (ह्यूमन रिसोर्सेस) म्हणून काम करीत असल्याचे तिचे प्रोफाईल सांगते. तेव्हापासून प्रोफाईलवर कोणतीही घटना घडलेली नाही. प्रोफाईलवरून असे दिसते की २००९ ते २०११ या कालावधीत शीना रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या ट्रेनिंग अँड ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटमध्ये शिकाऊ उमेदवार होती. बोराने सेंट झेवियर कॉलेजमधून अर्थशास्त्रात बी. ए. केले.
------------