शेतकरी दुहेरी संकटात
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
शेतकरी दुहेरी संकटात
शेतकरी दुहेरी संकटात
शेतकरी दुहेरी संकटातपाऊस नाही : पिकांवर रोगाचा प्रादुर्भावकुरूळी : येथील मोई, निघोजे, चिंबळी परिसरातील सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे़ खेड तालुक्यातील सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला असून पाने खाणार्या आळीने पीक फस्त केले आहे. या वर्षी भुईमूग, तूर, उडीद, मूग, चवळी कडधान्य सुकू लागली तर भात पीक पाण्याअभावी हातातून जाऊ लागले आहे. कोटशेतकरी मित्रांनी पाने खाणारी आळी असणार्या पिकावर क्लोरोपायरी फॉस २० टक्के ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळावे किंवा विवनॉलफॉस२० टक्के ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, या मुळे किड आटोक्यात येईल. - वसंतराव खंडागळे, चाकण कृषी मंडल अधिकारीफोटो : मोई,निघोजे, चिंबळी परिसरातील सोयाबीन पिकावर रोगाचा झालेला प्रादुर्भाव.