शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गहू वगळता धान्य तेजीत हरभर्‍याची आवक जेमतेम : दादरच्या आवकेत वाढ

By admin | Updated: March 23, 2016 00:11 IST

जळगाव- कृषि उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात गहू वगळता हरभरा, दादर (रब्बी ज्वारी), दुरी (ज्वारी), बाजरीचे दर तेजीत आहेत. होळीनंतर हरभर्‍याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज बाजारपेठ विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

जळगाव- कृषि उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात गहू वगळता हरभरा, दादर (रब्बी ज्वारी), दुरी (ज्वारी), बाजरीचे दर तेजीत आहेत. होळीनंतर हरभर्‍याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज बाजारपेठ विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

यंदा गव्हाची अपेक्षित क्षेत्रावर पेरणी झाली नव्हती. ३५ हजार हेक्टरवर पेरणीची अपेक्षा होती, पण फक्त २१ हजार हेक्टरवर जिल्‘ात पेरणी झाली. अशीच स्थिती दादर, बाजरी व हरभरा या पिकांबाबत आहे. जिल्हाभरात यंदा एक लाख ९० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी अपेक्षित होती, परंतु सर्व रब्बी पिकांची मिळून ९० हजार हेक्टरवर पेरणी झाली. यामुळे रब्बी पिकांचे अपेक्षित उत्पादन आलेले नाही. याचा परिणाम म्हणून की काय हरभरा, बाजरी, दादरचे दर तेजीत आहेत.

बाजार समितीमध्ये गहू वगळता इतर धान्याची हवी तशी आवकही सध्या नाही. परंतु होळीनंतर आवकेमध्ये वाढ होईल, अशी शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे.

दर्जा उत्तम
यंदा गहू, हरभरा, दादर, बाजरीचा दर्जा उत्तम प्रकारचा आहे. यंदा अवकाळी पाऊस झाला नाही. धान्याची कापणी, काढणी व्यवस्थित झाली. यामुळे चार ते पाच वर्षानंतर चांगल्या दर्जाचे धान्य स्थानिक भागातून बाजार समितीमध्ये येत आहे.

हरभरा तेजीत, काबलीला सात हजारांवर भाव
यंदा काबली व इतर प्रकारच्या हरभर्‍याचे फारसे उत्पादन झालेले नसल्याने त्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यात पुढील आठवड्यात आणखी २०० रुपयांनी वाढ होऊ शकते. काबली हरभर्‍याला तर सात हजार ३०० रुपये कमाल दर बाजार समितीमध्ये मिळाला.

बाजार समितीमधील घाऊक बाजारातील धान्याचे दर व आवक
(दर प्रतिक्विंटल व रुपयात, आवक क्विंटलमध्ये)
धान्यदरआवक
गहू-१५५० ते १७५०२१२
दादर-१७५० ते २२७५१३४
ज्वारी-१७७५५९
बाजरी-१८११६५
हरभरा-४१०० ते ४४००१००
काबली-७३०००८

कोट-
सध्या गहू वगळता इतर धान्याचे दर तेजीत आहेत. हरभर्‍याच्या दरात पुढील काळात आणखी वाढ होऊ शकते. हरभर्‍याची हवी तशी आवक नाही. उत्पादनातील घट त्यामागे कारणीभूत आहे. पण ज्वारी, गहू आदी धान्याची आवक पुढील काळात वाढू शकते. त्यानंतर दर स्थिर होतील.
-प्रवीण पगारिया, व्यापारी