ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १६ - देशभरात पहिल्या फेरीत भाजपाला शंभराच्या वर आघाडी मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
देशाच्या प्रमूख शहर आणि ग्रामीण भागातही कमळ फुलल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. मतमोजणीला एका तास होताच अनेक ठिकाणी भाजपाने आघाडी घेतल्याने दिल्लीच्या भाजपा कार्यकार्यालयामध्ये चहाचे वाटप करण्यात येत आहे. तर अनेक जण आपल्या मोबाईलमधून अभिनंदनांचे मॅसेज पाठविले जात आहेत.