जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले तर पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. सुमारे पाच दहशतवादी घुसखोरांच्या गटाचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांनी त्यांची कारवाई तीव्र केली आहे.
कठुआ परिसरातील सान्याल जंगलातील पूर्वीच्या घेरावातून पळून गेलेला हाच गट होता की अलीकडेच घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांचा दुसरा गट होता, याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही.
धक्कादायक! हत्येच्या भीतीने स्वत: पत्नीचे लग्न प्रियकरासोबत करुन दिले; मेरठ घटनेने पती घाबरला होता
मिळालेली माहिती अशी, चकमकीदरम्यान जोरदार गोळीबार आणि स्फोट झाले. राजबागच्या घाटी जुठाणा भागातील जाखोले गावाजवळ झालेल्या चकमकीत सुमारे पाच दहशतवाद्यांचा गट सहभागी होता. सुरुवातीच्या गोळीबारात विशेष पोलीस अधिकारी भरत चलोत्रा जखमी झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. कठुआ येथील रुग्णालयात उपचारानंतर त्यांना जम्मूतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने लष्कर, बीएसएफ आणि सीआरपीएफच्या मदतीने केलेल्या हल्ल्यात दोन दहशतवादी ठार झाले.
उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह तीन सुरक्षा कर्मचारी अडकल्याचे वृत्त आहे. चकमक संपल्यानंतरच स्पष्ट चित्र समोर येईल. रविवारी संध्याकाळी एसओजीने कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या एका गटाला रोखले होते.